Maharashtra Politics: मुख्यमंत्रीपदावरून मोठी हलचाल? सुनील तटकरे यांच्या विधानामुळे चर्चेंना विधान|VIDEO

Ajit Pawar become the next CM of Maharashtra: अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांनी जोर धरलाय... त्यासंदर्भात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी वक्तव्य केलंय... मात्र हे वक्तव्य इच्छा आहे की राजकीय संकेत?
Sunil Tatkare addressing the media on Ajit Pawar's potential elevation as Maharashtra's next Chief Minister.
Sunil Tatkare addressing the media on Ajit Pawar's potential elevation as Maharashtra's next Chief Minister.Saam Tv
Published On

अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा कधीच लपून राहिली नाही...अजितदादांच्या आईनेही दादांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त केली होती. तर काही उत्साही कार्यकर्त्यांनीतर दादांच्या वाढदिवसाला अजित पवारांच्या नावापुढे मुख्यमंत्री असं लिहिलं होतं. त्यातच आता सुनील तटकरेंनी अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याविषयी भाष्य केलंय... एवढंच नाही सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डचा उल्लेख करत अजित पवारांच्या सहा वेळा उपमुख्यमंत्रीपदाच्या विक्रमाचा उल्लेख केलाय.

मोहन भागवतांच्या विधानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवृत्तीच्या चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला पाठवण्याचीही चर्चा रंगलीय...त्यापार्श्वभुमीवर महाराष्ट्रातही राजकीय घडामोडींना वेग आलाय... महायुतीच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत...

अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तर एकनाथ शिंदेंनी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत... नेमकं याच काळात तटकरेंनी अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाविषयी भाष्य केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कुछ तो गडबड है, अशी स्थिती असल्याची चर्चा आहे...त्यामुळेच सुनील तटकरेंनी व्यक्त केलेली इच्छा ही फक्त इच्छाच आहे की आगामी काळात नेतृत्वबदलाचे संकेत? याची महाराष्ट्रातील जनतेला उत्सुकता आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com