Mahashivratri Rashifal Saam Tv
राशिभविष्य

Mahashivratri 2025: महाशिवरात्रीला 'या' राशींचं नशीब झटक्यात बदलणार; बुध-शनीमुळे मिळणार बक्कळ पैसा

Mahashivratri zodiac luck change : सध्या शनिदेव आपल्या मूलत्रिकोण राशीत कुंभ राशीत बसणार आहेत. यावेळी व्यवसायात लाभ देणारा बुध मीन राशीत प्रवेश करणार आहे. या दोन ग्रहांच्या चालीतील बदलामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये हिंदू धर्मातील सणांना विशेष महत्त्व देण्यात येतं. या ज्योतिषशास्त्रानुसार सणांच्या या काळात देखील ग्रह त्यांच्या चालीत बदल करतात. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस महाशिवारात्री आहे. महाशिवरात्रीच्या तारखेला शनी आणि बुधाच्या चालीमध्ये बदल होणार आहेत.

सध्या शनिदेव आपल्या मूलत्रिकोण राशीत कुंभ राशीत बसणार आहेत. यावेळी व्यवसायात लाभ देणारा बुध मीन राशीत प्रवेश करणार आहे. या दोन ग्रहांच्या चालीतील बदलामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. या राशींना अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणत्या राशींना याचा फायदा होणार आहे ते पाहूयात.

वृषभ रास

बुध आणि शनीच्या हालचालीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. बुध ग्रह तुमच्या राशीतून उत्पन्नाच्या घरात प्रवेश करणार आहे. या काळात कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहणार आहे. यावेळी तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकणार आहे. गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध आणि शनीच्या हालचालीतील बदल अनुकूल ठरू शकतात. कारण शनी तुमच्या राशीतून नवव्या भावात अस्त होणार आहे. त्यामुळे या वेळी तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती मिळू शकते. व्यवसायात अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत.

कुंभ रास

बुध आणि शनीच्या हालचालीतील बदल आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. शनी तुमच्या राशीतून लग्नभावात अस्त होणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी आकस्मिक लाभ मिळू शकणार आहे. तुमची लव्ह लाईफ चांगली राहणार आहे. कुटुंबात सौहार्द आणि सहकार्य राहणार आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचा भाजपला घरचा आहेर

कंठ दाटला, डोळ्यात पाणी; नाशिकच्या राड्यानंतर फरांदे स्पष्टच बोलल्या, थेट भाजपची चूक सांगितली

Pushkar Jog: 'माझं घर गेलं...'; मराठमोठ्या अभिनेत्याच्या मुंबईतील फ्लॅटला लागली भीषण आग, थोडक्यात वाचला जीव

Night Skin Care : रात्री झोपताना लावा 'हा' घरगुती फेस मास्क, सकाळी चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

Mumbai Tourism: 31 डिसेंबरला मुंबईतच पण गर्दी नसलेल्या ठिकाणी फिरायचंय? हे Hidden spots नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT