Planetary alignment forming Panchank Yog is expected to bring positive changes for selected zodiac signs in 2026. Saam tv
राशिभविष्य

Lucky Zodiac Sign: पंचांक योगामुळे 'या' चार राशींचे येणार अच्छे दिन, आयुष्याला मिळणार नवी कलाटणी; २०२६ मधील पहिला योग कधी तयार होणार?

Panchank Yog 2026: २०२६ मध्ये चार राशींना लाभकारी ठरणारा पंचांग योग, हा एक चमत्कारीक योग आहे. हा शुभ योग कधी तयार होणार आहे. याचा जीवन, यश आणि संपत्तीवर काय परिणाम होणार आहे. कोणत्या राशींसाठी हा योग फायदेशीर आहे हे जाणून घेऊ.

Bharat Jadhav

  • पंचांक योग हा शुभ व सर्जनशील ग्रहयोग मानला जातो

  • दोन ग्रह ७२ अंश अंतरावर असताना हा योग तयार होतो

  • २०२६ मध्ये चार राशींचे अच्छे दिन सुरू होणार

ज्योतिषशास्त्रात पंचांक योग ग्रहांच्या कोनीय स्थितींवर आधारित असतो. याला कोनीय किंवा द्वंद योग असेही म्हटलं जातं. कारण ते सूर्य, चंद्र आणि इतर ग्रहांच्या परस्पर समन्वयाचे प्रतिबिंबित करत असते. जेव्हा दोन ग्रह ७२° अंश अंतरावर असतात तेव्हा हा योग बनत असतो. ही एक आनंददायी, शुभ आणि सर्जनशील योग मानला जातो. याचा अनेक राशींच्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो.

पंचांगनुसार ४ जानेवारी २०२६ रोजी सूर्य आणि शनी पंचांक योग तयार करत आहेत. हा या वर्षातील पहिला पंचांक योग आहे. ज्योतिषी हर्षवर्धन शांडिल्य स्पष्ट करतात की या योगाच्या शुभ प्रभावामुळे नवीन वर्षात नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणात नवीन संधी येऊ शकतात. तसेच समाजात प्रतिष्ठा आणि आदर मिळेल. कोणत्या ४ राशींसाठी हा योग खूप फलदायी आहे हे जाणून घेऊया?

मेष

या योगाचा परिणाम मेष राशीच्या लोकांना सर्वात आधी जाणवेल. नवीन वर्षाच्या सुरुवातीला नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी येतील. समाजात तुमचा आदर वाढेल आणि तुमच्या कुटुंबात शांती आणि आनंद नांदेल. तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य आणि शिस्त तुम्हाला यश देईल.

सिंह

सिंह या राशीसाठी हा पंचांग योग सर्जनशील आणि शुभ ठरण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील आणि जुने वाद मिटतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यास अधिक सक्षमता वाटेल. नवीन संपर्क आणि मैत्री फायदेशीर ठरतील.

तूळ

तुळ राशीसाठी हा पंचांग योग नातेसंबंध आणि सहकार्यात लाभदायक ठरेल. कुटुंब आणि मित्रांसोबत सुसंवाद वाढेल. शिक्षण किंवा व्यवसायात नवीन संधी निर्माण होऊ शकतात. मानसिक शांती आणि संतुलन तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल. सर्जनशील काम आणि कलात्मक प्रयत्नांमध्ये यश मिळण्याची शक्यता याकाळात आहे.

मकर

या राशीसाठी, पंचंक योग शिस्त आणि कठोर परिश्रमाचे महत्त्व वाढवेल. दीर्घकाळ रखडलेले प्रकल्प प्रगती करतील.आर्थिक चणचण दूर होईल. समस्या संपतील. तुमचा सामाजिक दर्जा वाढेल. तुमच्या संयमाचे आणि कठोर परिश्रमाचे फळ हळूहळू दिसून येईल. तुमच्या आरोग्याबद्दल सावध राहणे महत्वाचे आहे, परंतु तुमची मानसिक शक्ती वाढेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई महापालिकेसाठी 'पॉवर पॅटर्न'? काका-पुतण्याने टाकला नवा डाव

गौतमी पाटील निवडणूक लढवणार? गौतमी पाटील होणार नगरसेविका?

Maharashtra Politics: महापालिकेसाठी भाजपचा नवा प्लॅन, ठाकरेंच्या रणनीतीला भाजपचा शह?

Maharashtra Corporation Election: मोठी बातमी! आमदार, खासदारांच्या पोरांना तिकीट नकोच; ऐननिवडणुकीत भाजपचा निर्णय

राज ठाकरेंच्या मनसेच्या संभाव्य उमेदवारांची पहिली यादी समोर, कोणाला कुठून संधी?

SCROLL FOR NEXT