Shani Nakshatra Transit  saam tv
राशिभविष्य

Saturn Transit 2026: जुलै महिन्यात ३ राशींवर बरसणार शनी देवाची कृपा; बुधाच्या नक्षत्रात प्रवेश करणार शनी

Shani Nakshatra Transit 2026: २ जुलै २०२६ रोजी शनी रेवती नक्षत्रात प्रवेश करणार असून कर्क, कन्या आणि कुंभ राशींसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. आर्थिक प्रगती, करिअरमध्ये यश आणि सकारात्मक बदलांचे संकेत ज्योतिषशास्त्रानुसार मिळत आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

कर्माचे फळ देणारा आणि न्यायाचा देव शनी जुलै महिन्यात गोचर करणार आहे. शनीच्या भ्रमणातील बदलाचा परिणाम केवळ देश आणि जगावरच नाही तर मानवी जीवनावरही होतो. ज्योतिषीय गणनेनुसार २ जुलै २०२६ रोजी शनी रेवती नक्षत्राच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करेल आणि १९ ऑगस्टपर्यंत या नक्षत्रात राहील.

रेवती नक्षत्राचा स्वामी बुध आहे. शनी आणि बुध यांच्यात मैत्रीचे नातं असून हे गोचर खूप महत्त्वाचे मानलं जातं. शनीच्या नक्षत्रातील बदलामुळे तीन शुभ राशींचे भाग्य बदलू शकते आणि नशिबाने प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात.

कर्क रास

कर्क राशीसाठी हे शनीचे गोचर भाग्यस्थानी असलेल्या नवव्या घरात होणार आहे. नववे घर हे भाग्याचे एक महत्त्वाचे स्थान मानले जाते. न्यायदेवता तुमच्या लाभाच्या सहाव्या घरावर दृष्टी टाकेल. ज्योतिषीय गणनेनुसार, हे शनीचे गोचर तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करेल. तुमच्या आर्थिक परिस्थितीत लक्षणीय सुधारणा होईल.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी शनीचे गोचर खूप विशेष असणार आहे. शनी तुमच्या राशीच्या सातव्या घरात गोचर करणार आहे. नोकरी करणाऱ्यांना प्रगतीच्या नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमचं बोलणं प्रभावी असेल आणि लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे.

कुंभ रास

शनी हा कुंभ राशीचा स्वामी असून ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांना शनीचा विशेष आशीर्वाद लाभतो. हे गोचर तुमच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा दूर करणार आहे. जमीन, घर किंवा वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. तुमच्या बँक खात्यातील शिल्लक वाढेल आणि खर्च नियंत्रणात राहील.

Disclaimer : राशीभविष्य ज्योतिषशास्त्राच्या आधारे तयार करण्यात आलं आहे. या माहितीवर आधारित घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: पुण्यातील आयटी इंजिनिअरची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिली कंपनीतील दोन महिलांची नावं, परिसरात खळबळ

Monsoon Update : मान्सून अडखळला! संपूर्ण महाराष्ट्र कधी व्यापणार? हवामान तज्ज्ञांनी दिली मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी सुनील भुसारा बिनविरोध

Shocking News: आंबे खाल्ल्यानंतर दोन बहीणींचा मृत्यू

370 Biryani Controversy: 'व्यक्ती बदलतात, वाद बदलतात, पण प्रेक्षक...'; 370 बिर्याणी वादावर अंकिता वालावलकरनं नेटकऱ्यांना सुनावलं

SCROLL FOR NEXT