Zodiac Signs Of The Billionaires Saam Tv
राशिभविष्य

Zodiac Signs: जगातील गडगंज श्रीमंत व्यक्तींची रास काय? यात तुमची रास आहे का? पाहा..

साहजिकच लोकांना त्यांच्यासारखे श्रीमंत व्हायचे असते. अनेकांना बऱ्याचदा हा प्रश्नही पडत असेल की या लोकांची रास काय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत लोकांचा विषय निघाला की सर्वांच्या नजरा त्या दिशेने वळतात. त्याला कारणही तसंच आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत आपलं नाव असणे ही काही छोटी-मोठी गोष्ट नाही. त्यांची आलिशान जीवनशैली, आलिशान घरे, महागड्या गाड्या, नौका, बेटे नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेतात. साहजिकच लोकांना त्यांच्यासारखे श्रीमंत व्हायचे असते. अनेकांना बऱ्याचदा हा प्रश्नही पडत असेल की या लोकांची रास काय? आज आम्ही तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर घेऊन आलो आहोत (Know The Zodiac Signs Of The Billionaires Of The World).

जगातील सर्वात प्रसिद्ध अब्जाधीशांपैकी एक असलेले बिल गेट्स (Bill Gates) यांची रास (Zodiac) वृश्चिक (Scorpio) आहे. अहवालानुसार, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांची एकूण संपत्ती सुमारे 137 अब्ज डॉलर आहे.

Bill Gates

जगातील सर्वात प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांची रास वृषभ (Taurus) आहे. अहवालानुसार, ते सुमारे 121 अब्ज डॉलर संपत्तीचा मालक आहे.

mark zuckerberg

गुगलच्या मूळ कंपनी अल्फाबेटचे संस्थापक लॅरी पेज (Larry Page) आणि सर्जे ब्रिन (Sergey Brin) हे जगातील अब्जाधीशांपैकी एक आहेत. लॅरी पेजची रास मेष (Aries) आहे आणि सेर्गे ब्रिनची रास सिंह (Leo) आहे. त्यांच्याकडे अनुक्रमे 131 अब्ज डॉलर आणि 126 अब्ज डॉलरची मालमत्ता आहे.

larry page and sergey brin

टेस्लाचे संस्थापक एलन मस्क (Elon Musk) यांची रास कर्क (Cancer) आहे आणि ते 278 अब्ज डॉलर संपत्तीचे मालक आहेत.

Elon Musk

अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) यांची रास मकर (Capricorn) आहे. ही ई-कॉमर्सच्या जगात सर्वात मोठ्या कंपन्यापैकी एक आहे. त्यांच्याकडे सुमारे 202 अब्ज डॉलरची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे.

jeff bezos

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

Hero Glamour X125 विरुद्ध Honda Shine 125; फीचर्स, मायलेज, कोणती बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे?

SCROLL FOR NEXT