Gajkesari Rajyog 2024 saam tv
राशिभविष्य

Gajkesari Rajyog: गुरु-चंद्राच्या युतीने तयार केला गजकेसरी राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून होणार नफा

Gajkesari Rajyog 2024: ग्रहांच्या गोचरमुळे तयार झालेल्या राजयोगाचा प्रभाव सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येतो. यावेळी दोन ग्रहांच्या युतीमुळे गजकेसरी राजयोग तयार झाला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. ग्रहांच्या गोचरमुळे तयार झालेल्या राजयोगाचा प्रभाव सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येतो. येत्या काळात गुरु आणि चंद्राच्या युतीने एक खास राजयोग तयार होणार आहे.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, गुरूने 12 वर्षांनी वृषभ राशीत प्रवेश केला आहे. तर चंद्राने 22 सप्टेंबरला वृषभ राशीत प्रवेश केलाय. या दोन ग्रहांच्या युतीमुळे गजकेसरी राजयोग तयार झाला आहे. या योगाच्या निर्मितीमुळे काही लोकांच्या आयुष्यात अचानक सुख येणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना या काळात लाभ होणार आहे.

कुंभ रास

गजकेसरी राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होणार आहे. जोडीदाराच्या नात्यात गोडवा येईल. तुम्हाला आनंदाची बातमी देखील मिळू शकते. मालमत्तेशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल आहे.

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग शुभ सिद्ध होऊ शकणार आहे. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. भागीदारी व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. बु तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळणार आहे. व्यावसायिकांना कर्जाचे पैसे मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीचे तुम्हाला अचानक लाभ मिळतील.

कन्या रास

गजकेसरी राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. तुमच्या करिअरमध्ये आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळू शकणार आहेत. अनेक व्यवसायांमध्ये तुमचे नशीब आजमावू शकता. धार्मिक आणि शुभ कार्यक्रमातही सहभागी होऊ शकता. सामाजिक कार्यात तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress No Makeup Look: ही क्यूट अभिनेत्री कधीच करत नाही मेकअप, लवकरच करणार 'रामायण'मध्ये काम

Mhada Konkan : म्हाडाच्या ७१ अनिवासी गाळ्यांचा ई लिलाव; नोंदणी अर्ज, बोली आणि निकाल कधी? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: अजित पवार यांचे मंत्रीपद आणि आमदारकी रद्द व्हावी यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे तक्रार करणार : काळुराम चौधरी

KDMC : २७ गाव वगळून प्रभाग रचना करावी; केडीएमसीकडे काँग्रेस, उबाठा, मनसेची मागणी

Akola Riots : अकोला दंगल प्रकरणात सुप्रीम कोर्टचा पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचा आदेश

SCROLL FOR NEXT