Guru Vakri saam tv
राशिभविष्य

Guru Vakri: गुरुने वक्री होऊन तयार केला पॉवरफुल राजयोग; 'या' राशींच्या व्यक्ती रातोरात होणार गडगंज श्रीमंत

Guru Vakri Kendra Trikon Rajyog 2025: ज्योतिषशास्त्रात सर्वात महत्त्वाचे आणि शुभ ग्रह मानले जाणारे देवगुरु बृहस्पती लवकरच वक्री झाला आहे. यामुळे राजयोगाची निर्मिती झाली असून काही ठराविक राशींना फायदा होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

नवग्रहांपैकी एक महत्त्वाचा ग्रह म्हणजे गुरु ग्रह. हे देवतांचे गुरु आहेतच सोबत सौभाग्य, संपत्ती, ज्ञान आणि सन्मानाचे यांचे कारक मानले जातात. काल म्हणजे ११ नोव्हेंबर २०२५ रोजी ते त्यांच्या उच्च राशीत म्हणजेच कर्क राशीत वक्री झाले असून ही अवस्था ११ मार्च २०२६ पर्यंत कायम राहणार आहे. डिसेंबरमध्ये गुरु मिथुन राशीत प्रवेश करणार आहे.

गुरुच्या कर्क राशीत वक्री होण्यामुळे हंस राजयोग आणि केंद्र-त्रिकोण राजयोग तयार झालेत. गुरुच्या या स्थिती बदलामुळे काही राशींना या विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींचं नशीब फळफळणार आहे ते पाहूयात.

मीन राशी (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी गुरु बृहस्पती हे दशम भावाचा स्वामी असून सध्या पंचम भावात वक्री अवस्थेत आहेत. त्यामुळे केंद्र-त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. गुरु हे या राशीचे स्वामी ग्रह असल्यामुळे त्यांचा वक्री होणं ही स्थिती लाभदायक ठरू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत दिसून येणार आहे. अनावश्यक खर्च टाळा.

मेष राशी (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी गुरुचा उच्च राशीत वक्री होणं आणि केंद्र-त्रिकोण राजयोग तयार होणं अत्यंत लाभदायक ठरू शकणार आहे. मागील काही काळात अडथळे आलेल्या कामांमध्ये आता प्रगतीचे संकेत मिळू शकणार आहे. वैयक्तिक जीवनातही स्पष्टता येईल आणि कुटुंबातील संबंध सुधारणार आहेत. आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही ही वेळ तुम्हाला अंतर्मुख करेल.

कर्क राशी (Cancer)

कर्क राशीच्या लोकांसाठी गुरुचं वक्री होणं आणि केंद्र-त्रिकोण राजयोग तयार होणं अत्यंत शुभ असणार आहे. यावेळी उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही विरोधकांवर विजय मिळवू शकणार आहात. आत्मचिंतनाची भावना प्रबळ राहील, ज्यामुळे कर्म सुधारण्याची दिशा मिळेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Nasik: नांदूरमधमेश्वर येथे पुराने वेढलेल्या बेटावर अडकलेल्या पाचही जणांना वाचवण्यात यश

Dapoli Waterfalls : कोकणची जादू! दापोलीत लपलेत सुंदर धबधबे, एकदा पाहाल तर पुन्हा पुन्हा जाल

Snake : पावसाळ्यात सापांना 'ही' ६ झाडे आवडतात, कारण वाचून येईल चक्कर

Konkan-Ghavane Recipe : गरमागरम चहा अन् मऊ, जाळीदार घावणे, पावसाळ्यात बनवा अस्सल कोकणी नाश्ता

डोंबिवलीतील शिंदे गटाच्या नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक; डॉक्टरांना मारहाण करणं पडलं महागात

SCROLL FOR NEXT