Horoscope  Saam Tv
राशिभविष्य

Today's Horoscope : स्वामींच्या कृपेने ५ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार, गुरूवार तुमच्यासाठी कसा असेल?

Thursday Horoscope in Marathi: स्वामी समर्थांच्या कृपेने गुरुवारी ५ राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ, करिअरमध्ये यश, कौटुंबिक सुख आणि नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

वृषभ (Taurus)

बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामे आणि मनातील चिंता आता मिटणार आहेत. स्वामींच्या कृपेने तुमच्या अंगी एक नवी ऊर्जा येईल. "माझ्या भक्ताचे कष्ट वाया जाऊ देणार नाही," या स्वामींच्या उक्तीनुसार तुमच्या नोकरी-व्यवसायात मोठी प्रगती होऊन आर्थिक स्थैर्य लाभेल.

मिथुन (Gemini)

तुमच्या घरावर स्वामींची अखंड कृपा बरसणार आहे. तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल आणि घरात आनंदी वातावरण राहील. अचानक धनलाभाचे योग येतील आणि उत्पन्नाचे मार्ग खुले होतील. समाजात मान-सन्मान वाढवून स्वामी तुमची मान अभिमानाने उंच करणार आहेत.

कर्क (Cancer)

खुद्द तुमच्याच राशीत हा मोठा शुभ संयोग होत असल्याने स्वामींचे आशीर्वाद थेट तुमच्या पाठीशी उभे ठाकणार आहेत. आरोग्य, करियर आणि कौटुंबिक आघाड्यांवर असणारी सर्व विघ्ने स्वामी स्वतः दूर करतील. अविवाहित लोकांचे विवाह जमवून आणण्यात स्वामींचे संकेत मिळतील.

कन्या (Virgo)

"अशक्य ही शक्य करतील स्वामी..." याचा प्रत्यक्ष अनुभव कन्या राशीच्या लोकांना येणार आहे. नशिबाची भक्कम साथ मिळून वर्षानुवर्षे रखडलेली कामे स्वामींच्या कृपेने क्षणार्धात पूर्ण होतील. घरामध्ये सुख-शांती नांदेल आणि शत्रूंचा नायनाट होईल.

मकर (Capricorn)

गेल्या काही काळापासून आर्थिक तंगीत असणाऱ्या मकर राशीच्या भक्तांना आता स्वामी मोठा दिलासा देणार आहेत. अडकलेला पैसा स्वामींच्या कृपेने सुखरूप परत मिळेल. नोकरीत प्रमोशन आणि पगारवाढीचे सुखद धक्के मिळतील. नवीन घर, जमीन किंवा वाहन खरेदीचे तुमचे स्वप्न स्वामी महाराज आता पूर्ण करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकारणातील ज्येष्ठ नेतृत्व हरपले; माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांचे निधन

Maharashtra News Live Update: पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

आता अनेक महीने वाट बघण्याची गरज नाही; 1 ते 3 दिवसांत मिळणार पासपोर्ट; पण ‘ही’ अट महत्त्वाची

Satara Fort : महाबळेश्वरला गेलात? 'या' किल्ल्यावरून दिसतं सह्याद्रीचं मनमोहक सौंदर्य!

SCROLL FOR NEXT