February 2025 Grah Gochar saam tv
राशिभविष्य

February Grah Gochar: फेब्रुवारीमध्ये 'या' राशींची होणार चांदीच चांदी; ग्रंहांच्या गोचरमुळे जगणार राजासारखं आयुष्य

February 2025 Grah Gochar: ज्योतिष शास्त्रानुसार, फेब्रुवारी महिन्यात 4 ग्रहांच्या राशींमध्ये बदल होणार आहे. या महिन्यात बुध दोन वेळा भ्रमण करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने फेब्रुवारी महिना खूप खास असणार आहे. याचं कारण म्हणजे या महिन्यात अनेक मोठे ग्रह त्यांच्या राशीत बदल करणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार, फेब्रुवारी महिन्यात 4 ग्रहांच्या राशींमध्ये बदल होणार आहे. या महिन्यात बुध दोन वेळा भ्रमण करणार आहे. यामध्ये सूर्य, मंगळ आणि गुरूच्या स्थितीतही बदल होणार आहे.

यामुळे फेब्रुवारी महिना काही राशींसाठी खूप भाग्यवान ठरू शकणार आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये कोणते ग्रह आपली राशी बदलणार आहेत आणि कोणत्या राशींना त्याचा फायदा होणार आहे ते जाणून घेऊया.

वैदिक दिनदर्शिकेनुसार, 4 फेब्रुवारी 2025 रोजी, देवतांचा स्वामी बृहस्पति वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. 11 फेब्रुवारीला बुध शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सूर्यही कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या गोचरमुळे कुंभ राशीमध्ये सूर्य, बुध आणि शनि यांचा त्रिग्रही योग तयार होणार आहे. याशिवाय मंगळ वृषभ राशीत तर बुध मीन राशीत प्रवेश करणार आहे.

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना खूप चांगला राहणार आहे. नोकरदार लोकांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ चांगला राहील. परदेश दौऱ्याची योजनाही बनू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

सिंह रास

फेब्रुवारी महिना सिंह राशीच्या लोकांसाठी आनंदाचा असणार आहे. मुलांशी संबंधित समस्या संपणार आहे. तुम्हाला प्रेमविवाह करायचा असेल तर हीच योग्य वेळ आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. नोकरी आणि नवीन प्रकल्पात बढती मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना खूप शुभ राहणार आहे. जर तुम्हाला काही नवीन काम सुरू करायचं असेल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. अभ्यास आणि स्पर्धांमध्ये यश मिळू शकणार आहे. तीर्थयात्रेला जाण्याचीही शक्यता आहे. मोठ्या व्यक्तींशी भांडणं टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Fort : पावसाळ्यात फक्त १०० रुपयांत वरळी जवळच्या या किल्ल्याला द्या भेट

GK: 'या' देशात विद्यार्थी स्वतः शौचालये स्वच्छ करतात

HBD Ranveer Singh : वाढदिवस अन् सर्व इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट; रणवीर सिंहचं नेमकं चाललंय तरी काय?

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

SCROLL FOR NEXT