Laxmi Narayan Rajyog saam tv
राशिभविष्य

Laxmi Narayana Rajyog: फेब्रुवारी महिन्यात मिथुनसह ४ राशी कमावणार बक्कळ पैसा; लक्ष्मी नारायण योग देणार धन-संपत्ती

Laxmi Narayana Rajyog 2026: फेब्रुवारी महिन्यात लक्ष्मी नारायण योगाची निर्मिती होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग अत्यंत शुभ मानला जातो. या काळात चार राशींना विशेष धनलाभ, संपत्ती आणि समृद्धी मिळण्याची संधी निर्माण होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

येत्या काही दिवसातच फेब्रुवारी महिना सुरू होणार आहे. या महिन्यात लक्ष्मी नारायण राजयोग शनीच्या कुंभ राशीत निर्माण होणार आहे. वैदिक पंचांगानुसार बुध ३ फेब्रुवारी रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर ६ फेब्रुवारी रोजी शुक्रही या राशीत गोचर करणार आहे.

यामुळे शास्त्रानुसार, ६ फेब्रुवारी रोजी लक्ष्मी नारायण राजयोग कुंभ राशीत निर्माण होणार आहे. हा राजयोग २ मार्च रोजी संपणार आहे. ज्यावेळी बुध कुंभ राशी सोडून मीन राशीत गोचर करेल. या काळात, लक्ष्मी नारायण राजयोग सुमारे ३० दिवसांसाठी चार राशींना लाभ देणार आहे. या ४ राशी कोणत्या आहेत ते पाहूयात.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन कमाईच्या संधी निर्माण होणार आहेत. खर्च वाढतील आणि परंतु उत्पन्न उत्तम राहील. व्यवसायात गुंतलेल्यांसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. तुमचा नफा अपेक्षेपेक्षा जास्त असू शकतो. अविवाहितांसाठी लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.

वृश्चिक रास

६ फेब्रुवारी ते २ मार्च या काळात आर्थिक परिस्थिती अनुकूल राहणार आहे. पैसे सहज मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींचे पगार वाढणार आहे. व्यावसायिकांनाही त्यांचा नफा दुप्पट दिसू शकतो. तुम्ही घर, दुकान किंवा नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. फेब्रुवारीमध्ये तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे.

मकर रास

शुक्र आणि बुध राशीचा लक्ष्मी नारायण राजयोग मकर राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या खूप शुभ राहणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे. खर्च नियंत्रणात राहणार आहे. कर्ज आणि कर्जाचा ताण कमी होऊ शकतो. तुमच्या बँक बॅलन्समध्ये वाढ होणार आहे.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांना शनिच्या साडेसती आणि राहूचा परिणाम जाणवणार आहे. त्यांच्या लग्नात लक्ष्मी नारायण राजयोगाची निर्मिती होणार आहे. या राशींना अचानक आर्थिक लाभ होतील. तुम्हाला अज्ञात स्त्रोतांकडून पैसे मिळू शकतात. तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीचा मोठा भाग तुम्हाला मिळू शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेत त्या व्यक्तीची दमदार एण्ट्री; सामाजिक क्रांतीचा महत्त्वाचा अध्याय उलगडणार

Ajit Pawar Funeral: अजितदादांना काकी प्रतिभा पवार यांच्याकडून पाणवलेल्या डोळ्यांनी अखेरचा निरोप; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

Bigg Boss Marathi 6 : "आवाज जास्त चढवू नकोस..."; सागर कारंडे अन् प्रभूमध्ये टोकाचे भांडण, बिग बॉसच्या घरातील वातावरण तापले|VIDEO

Ajit Pawar Death: 'दादा कुठल्यातरी रुपात परत या...' लाडक्या बहि‍णींना फोडला हंबरडा | VIDEO

SCROLL FOR NEXT