Guru-Shani Vakri saam tv
राशिभविष्य

Guru-Shani Vakri: दिवाळीत गुरु-शनी चालणार उलटी चाल; 'या' राशींना अचानक मिळणार भरपूर पैसे

Surabhi Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रह त्यांच्या राशीबदलासोबत वक्री आणि मार्ग्रस्थ देखील होतात. नऊ ग्रहांपैकी शनि आणि गुरु हे सर्वात खास ग्रह मानले जातात. या दोन्ही ग्रहांच्या हालचालीचा प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर परिणाम होतो.

सध्या गुरू वृषभ राशीत असून शनि कुंभ राशीत आहे. गुरू आणि शनीच्या उलट हालचालीमुळे काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकणार आहे. यावेळी काही राशींना अमाप संपत्ती मिळू शकणार आहे. तर काहींना आनंद मिळणार आहे. जाणून घेऊया या दोन्ही ग्रहांच्या वक्री स्थितीने कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे.

वृषभ रास

या राशीच्या लोकांना गुरू आणि शनीच्या वक्री चालीमुळे बरेच फायदे मिळणार आहेत. या दोन ग्रहांची वक्री चाल या राशींच्या लोकांसाठी अनुकूल आहे. यावेळी नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या समस्यांपासून सुटका मिळणार आहे.

कुंभ रास

या राशीच्या लोकांसाठी गुरू आणि शनीची वक्री चाल फायदेशीर ठरू शकते. यावेळी प्रलंबित कामं पूर्ण होणार आहेत. कुटुंबाकडून सहकार्य मिळणार आहे. रखडलेल्या कामांना गती मिळेल. संपत्तीत झपाट्याने वाढ होऊ शकते. घर खरेदीचं स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले पैसे परत मिळू शकतात.

धनु रास

बृहस्पति आणि शनीची वक्री चाल या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात भरपूर यश मिळवू शकतात. तुम्ही तुमच्या कामात समाधानी असणार आहात. आर्थिक स्थितीही चांगली राहणार आहे. अनावश्यक खर्चापासून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silver Rate Today : चांदीचा भाव १ लाखांच्या पुढे; गगनाला भिडलेले तुमच्या शहरातील दर वाचले का?

Nandurbar News : भरत गावित यांना राष्ट्रवादीची उमेदवारी; नाराज कार्यकर्त्यांकडून पक्षाचा सामूहिक राजीनामा

Prithvi Shaw: वाढतं वजन अन् उद्धटपणा नडला? टीम इंडियानंतर मुंबई संघातूनही पृथ्वी शॉची सुट्टी

Salman Khan News: आधी ५ कोटींची खंडणी मागितली; अटक केल्यावर म्हणतो, चुकून मेसेज आला, सलमान-बिश्नोईचा वाद मिटवतो!

Sanjay Raut: फक्त ५ कोटी दाखवले, १० कोटी झाडी- डोंगरात पोहोचले, राऊतांचे CM शिंदेंवर खळबळजनक आरोप!

SCROLL FOR NEXT