वार - बुधवार ज्येष्ठ कृष्णपक्ष तिथी. व्दादशी-७:११ नंतर त्रयोदशी. नक्षत्र-रोहिणी.योग-शूल. करण - तैतील. रास - वृषभ. दिनविशेष क्षयतिथी.
आपली प्रवृत्ती थोडी उधळी आहे. खर्चाला आळा काही केल्या बसत नाही. आज मात्र त्याच्यावर नियंत्रण हवे. विनाकारण त्रास आणि मनस्ताप न होऊ देता दिवस चांगला जायचं असेल तर उपासने सारखा चांगला पर्याय नाही.
"केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे". अनेक गोष्टी आपण इतरांना करून दाखवाल आणि त्यांच्यासाठी तुम्हीच एक सुंदर प्रतिमा बनाल. आपल्या सकारात्मकतेला सलाम मिळेल. एकूणच पैसा आणि व्यक्तिमत्व विकास दोन्ही गोष्टी पारड्यात पडतील.
बोलका स्वभाव असल्यामुळे कुटुंबीय आज आपल्यावर फिदा होतील. हो पण एक गोष्ट लक्षात ठेवा कुठल्याही कागद पत्र संबंधी आज मोठी रिस्क घेऊ नका. वडिलोपार्जित इस्टेटचे व्यवहार मार्गी लागतील.
फिरणे, भ्रमंती हे आपल्याला आवडते आणि आज याच गोष्टी घेऊन आजचा दिवस आला आहे. मनासारखे जगण्यासाठी अनेक युक्त्या कराल. प्रेमाने जग जिंकाल.
आपल्याला अनेकांचे पोशिंदे होता येते. स्वभावही आपला उदार आहे. याचप्रमाणे घरची जबाबदारी आज नेटाने निभावाल. किती केले यापेक्षा कसे केले यात सार्थकता मानाल.
आपली बौद्धिक रास आहे सातत्याने नवीन शिकण्याचा ध्यास आहे. आणि हेच करत असताना ओळखीही वाढतील. दिवस कला, मनोरंजन आणि व्यवसायाच्या दृष्टीने सुवर्णसंधी घेऊन आलेला आहे.
उत्साह आणि उमेद कायम ठेवायचे असेल तर "चोरावर मोर" होऊन राहावेच लागते. शुक्राच्या अंमलाखाली असणारी आपली वायु तत्वाची रास. काही गोष्टी वाऱ्याचे वेगाने घडतील पण अडचणीतून मार्ग काढाल.
खुपदा आपल्याला आतल्या गाठीचे म्हणून हिणवले जाते. पण त्याचा विचार करू नका. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. आजचा दिवस व्यवसायासाठी वृद्धी घेऊन आलेला आहे. त्याचा फायदा करून घ्या. कोर्टकचेरीत यश मिळेल.
मनाला नेहमी प्रश्न भेडसावतो की आपण इतरांचा वाईट करत नाही पण आपल्या मार्गे काटे का? पण याचा सामना आजही आपल्याला करावा लागेल. सन्मार्गाने चला अडचणी वाढवून घेऊ नका.
कष्ट हेच पालुपद आपल्या आयुष्याला चिकटलेले आहे. पण त्याचा विशेष त्रासही आपल्याला होत नाही. आज दिवस मात्र सकारात्मकतेने जगाल. मोठ्या प्रवासासाठी जाणार असल्यास त्याची आखणी कराल. अध्यात्मात मन रमेल.
मीपणा सोडून कामाला लागाल. दिवस अगदी धावपळीचा जाणार आहे. नवीन कार्य हातून घडेल. आणि त्याचा इतरांना फायदा होईल. संधी आलीच आहे तर दार उघडा.
काय करू आणि काय नको असा आजचा दिवस राहील. सगळीकडे लाभच लाभ छोट्या दिवसांमध्ये अनेक गोष्टींची पेरणी आहे. त्याकडे सकारात्मकतेने बघालच आणि इतरांना आनंद द्याल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.