वार - शनिवार आषाढ शुक्लपक्ष. तिथी प्रतिपदा. नक्षत्र - पुनर्वसु. योग - व्याघात. करण - किंन्स्तुघ्न. रास मिथुन. दिनविशेष - चांगला दिवस.
जुन्या काही चांगल्या गोष्टी तुम्ही केल्या असतील तर त्याचा परतावा म्हणून लाभ मिळण्याचा आजचा दिवस आहे. आपल्याला कृतकृत झाल्याची भावना येईल. त्यामुळे आनंद वाटाल.
मोक्षाकडे जाण्याचा एक मार्ग म्हणजे देवाची उपासना. काही वेळेला संकट किंवा मनस्वस्थ बिघडणं या गोष्टी आयुष्यात आलेल्या चांगल्या असतात. म्हणूनच उपासना करा आपले मनस्वास्थ्य चांगले ठेवण्याचा आज प्रयत्न करा.
हलकं फुलकं वातावरण कसं ठेवायचं हे आपल्याकडून शिकायला हवं. आज असाच दिवस. सकारात्मकता देणारा त्याच्या दृष्टीने पुढे वाटचाल करायला लावणारा. इतरांना आनंद वाटत सुटाल.
जिभेचे चोचले ते किती पुरवावेत? असा आजचा दिवस आहे. आपणही आपले लाड करून घ्याल इतरांनाही अनेक पदार्थ करून घालण्याचा मूड येईल. कुटुंबीयांसोबत दिवस आनंदी जाईल. पैशाची आवकही चांगली राहील .
खरंतर नको त्या गोष्टीत ताठपणा आणि बाणा असा आपला स्वभाव आहे. पण आज त्याचा तुम्हाला अभिमान वाटेल. कारण याच्यासाठी असणारं वेगळं धाडस तुम्हाला आज करावे लागेल. सर्वांकडून शाब्बासकीची थाप मिळेल.
चिकित्सकपणा करूनही पदरी काही पडत नाही असं लक्षात येईल. म्हणूनच सहज दिवस घालवण्यासाठी आज तुम्ही सर्वांशी मिळून मिसळून वागाल. जागेचे व्यवहार, कामे मार्गी लागतील.
कलासक्त आयुष्य जगायला आपल्याला आवडते. म्हणूनच आज त्याच्यासाठी स्वतःला सुपूर्त कराल. उपासनेसाठी सुद्धा दिवस विशेष महत्त्वाचा आहे. विष्णू उपासना करावी, त्याचा फायदा होईल.
हाताखालच्या लोकांपासून जपून राहा. चोरी, वस्तू गहाळ होणे असे त्रास होण्याची शक्यता आहे. कोणावर संशय घेण्यापेक्षा आधीच आपण आपल्या वस्तू जपलेल्या बरे ना. गुप्त शत्रू वाढतील.
कामासाठी प्रवासाचा आजचा दिवस आहे. कोर्टाची कामे मार्गी लागतील. यशाच्या दृष्टीने नवीन पावले टाकाल. व्यवसायात अनेक संधी निर्माण होतील. जोडीदाराची साथ सुद्धा चांगली लाभेल.
जे जेवढे नशिबात ते तेवढेच मिळते. नको त्या गोष्टींच्या मागे लागून किंवा गुप्तधन, भ्रष्टाचार, काळा पैसा या गोष्टींच्या मागे लागू नका. आजचा दिवस अडचणीत आणणार आहे.
मोठे प्रवास, तीर्थयात्रा, परदेश गमन अशा गोष्टींसाठी संधी येतील. त्याचे बेत आखाल. संशोधनात्मक कार्य आपल्याकडून घडेल. आध्यात्मिक बैठक चांगली राहील.
करिअरसाठी विशेष धावाधाव होईल. आपल्या बॉसची मर्जी राखावी लागेल. तसेच सहकाऱ्यांशी जमवून घ्यावे लागेल. बढतीचे योग आहेत. त्या दृष्टीने पावले उचला. किर्ती, संपदा वाढेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.