वार - शनिवार तिथी - ज्येष्ठ शुक्ल नवमी. नक्षत्र - उत्तरा. योग - व्यतिपात. करण - बालव. रास - कन्या. दिनविशेष - व्यतिपात वर्ज्य.
"आलाय माझ्या राशीला" असा काहीसा दिवस राहील. डोकेदुखी तब्येतीच्या तक्रारी, पोटाचे आजार सतावतील. त्यामुळे आजच्या दिवशी पित्त वाढणार नाही आणि डोके शांत राहील यासाठी तुम्ही स्वतः काम करा.
शेअर्स किंवा तत्सम बाबतीत पैसे गुंतवणार असाल तर फार काळजीपूर्वक पैसे गुंतवा. अति कोणतीही गोष्ट चांगली नाही. आपल्या राशीला सर्व सुख सोयी आणि सुखलोलुपता आहे पण त्यासाठी पैसा वाममार्गातून मिळवू नका.
स्वभावाप्रमाणेच आज बरा दिवस राहील. बोलून आपल्या कुटुंबीयांच्या बरोबर बरे वाटेल. घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ राहील. आपण जबाबदारी झटणार नाहीत तर नेटाने कामात पुढे राहाल.
छोटे प्रवास घडतील. आपण केलेल्या कार्याचे कौतुक होईल. वरिष्ठांकडून शाबासकीची थाप आज मिळणार आहे. दिवस चांगला.
वस्त्र, अलंकार याच्या प्राप्तीसाठी दिवस छान आहे. विशेषत्वाने पैशाची गुंतवणूक आणि एकूण कुटुंबीयांचे सहकार्य चांगले राहणार आहे.
द्विधा मनस्थिती झटकून नवीन काहीतरी काम करण्यासाठी पुढे सरसावाल. त्यामध्ये यश नक्की आहे. सकारात्मकता टिकून राहील. सर्वांबरोबर काम कराल.
मनस्थिती सांभाळा. परिस्थिती हातात नसते. आहे त्या गोष्टी तोंड देणे एवढेच आपल्याकडे आहे. कामाविषयी काही बालंट आज येण्याची शक्यता आहे. म्हणून सावधगिरीने पावले टाका.
सर्व प्रकारचे लाभ घेऊन आजचा दिवस आलेला आहे. ज्येष्ठ ,कनिष्ठ दोघांनाही आज तुम्ही आपलेसे वाटणार आहात. इतरांसाठी काम करण्यात आनंद आहे ही जाणीव आज होईल. समाजकारणात यश.
राजकारणात यश मिळेल. आपण केलेले काम हे अचूक आहे हे तुम्ही दुसऱ्याला सिद्ध करून दाखवाल. त्याच कामाविषयी आपल्याला विशेष पारितोषिक किंवा अनुमोदन मिळू शकेल. कामासाठी प्रवास होतील.
प्रवासात अडथळे निर्माण होतील. शिव उपासना करा. आजचा दिवस चांगला राहील. विनाकारण कोणाची निंदा-नालस्ती, कटकटी यापासून स्वतःला दूरच ठेवा.
शारीरिक स्वास्थ्य जपा. अडचणी कटकटी या गोष्टी वाटेत येतील पण आज काट्यासारख्या बाजूला काढून ठेवा. स्वतः मधली उर्मी आणि ताकद ओळखा आणि पुढे चला.
"स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला" अशा काहीतरी छान भावना मनामध्ये जोडीदाराविषयी येतील. दोघांचं बॉण्डिंग छान राहील. दिवस आज आनंदात घालवाल. कोर्टकचेरीची कामे आणि निकाल मनाप्रमाणे लागतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.