Horoscope Today in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागणार, प्रवास शक्यतो टाळावेत; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

Anjali Potdar

आजचे पंचांग

शुक्रवार,४ ऑक्टोबर २०२४, अश्विन शुक्लपक्ष.

तिथी- द्वितीया २९|३१

रास- तुला

नक्षत्र- चित्रा

योग- वैधृति

करण-बालव

दिनविशेष-वैधृति वर्ज्य

मेष - वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद साधण्याचा आज दिवस आहे. एकूणच आनंदामध्ये भर पडेल. भागीदारी व्यवसायामध्ये सुयश लाभेल.

वृषभ - वेळ आणि पैसा वाया जाण्याची आज शक्यता आहे. काही जणांचा मनोरंजनाकडे कल राहणार आहे.

मिथुन - शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. वरिष्ठांचे सहकार्य आणि कनिष्ठानचे सहाय्य मिळेल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल होईल.

कर्क - राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. प्रॉपर्टी सौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे .काही महत्त्वाची कागदपत्रे आज करून घ्यायला हरकत नाही.

सिंह - नोकरीत समाधानकारक स्थिती राहणार आहे. एखादी महत्त्वाची जबाबदारी अंगावर येऊन पडेल. पण ती आवडीने पार पाडाल.

कन्या - आर्थिक निर्णय मार्गी लागतील. कौटुंबिक जीवनामध्ये सुसंवाद साधण्याचा आजचा दिवस आहे. विशेष काही पदार्थ खावे असे आज वाटेल.

तूळ - आपली दैनंदिन कामे मार्गी लागण्याचा आज दिवस आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आपल्या राशीच्या गुणधर्माप्रमाणे दिवस आनंदात जाईल.

वृश्चिक - कोणाच्या सहकार्याची अपेक्षा न करताना पुढे चला. प्रवास शक्यतो टाळावेत. प्रवासात मनस्ताप संभवतो आहे.

धनु - अनेकांचे सहकार्य लाभण्याचा आज दिवस आहे. मित्र-मैत्रिणींचा, शेजाऱ्यांचा सहवास लाभेल. नातेवाईकांबरोबर स्नेहभोजनाच्या संधी येतील.

मकर -तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये सन्मान आणि प्रसिद्धी लाभेल. प्रतिष्ठा वाढेल. अनेक संधी आपल्या वाट पाहत आहेत त्याचे स्वागत करा.

कुंभ - काहींच्या धार्मिक कार्यामध्ये सहभाग राहील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. स्वतःच्या भाग्यावर खुश होऊन जाल.

मीन - शक्यतो वादविवाद टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढते राहील म्हणून अनावश्यक खर्च टाळा किंवा हिशोब नीट जपा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani News : नाफेडची १५ ऑक्टोबरपासून सोयाबीन खरेदी; परभणी जिल्ह्यात आठ खरेदी केंद्र

Tharala Tar Mag Actress: नवऱ्याच्या, लेकीच्या कारने खूप फिरले आता स्वत:ची हवी; 68 व्या वर्षी लोकप्रिय अभिनेत्रीचं स्वप्न पूर्ण

Navratri Trending Songs: एकदा वाजवून तर बघा ; नवरात्रीत ही धुमाकूळ घालणारी गाणी

Wardha News: उमेदवारीचा घोळ! शुभेच्छांचे संदेश व्हायरल झाले अन् तासाभरात डिलीटही केले; नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Updates: हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी कॅाग्रेस शरद पवार पक्षातील प्रवेश देखील खडतर ठरण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT