Horoscope Today Marathi  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : गणरायाची कृपा होणार, मनासारखा जोडीदार मिळणार; वाचा आजचे राशिभविष्य

Anjali Potdar

आजचे पंचाग

रविवार,८ सप्टेंबर २०२४,भाद्रपद शुक्लपक्ष,ऋषीपंचमी, जैन संवत्सरी.

तिथी-पंचमी १९|५९

रास- तुला

नक्षत्र- स्वाती

योग-ऐंद्रयोग

करण-बवकरण

दिनविशेष-१५ प. चांगला

मेष - विवाह उत्सुक उमेदवारांक्या विवाहाविषयी अनुकूल बोलणी होण्याचा आजचा दिवस आहे. मनासारखा जोडीदार मिळेल. कामकाजाच्या ठिकाणी आपली सर्व मेहनत कामी येईल.

वृषभ - आजोळी चांगले संबंध प्रस्थापित होतील. मामाकडून विशेष लाभाचे योग आज आहेत. प्रवासामध्ये त्रास होईल. दिवसामध्ये येणाऱ्या गोष्टीला धिराने तोंड द्यावे लागेल.

मिथुन - कलेमध्ये प्रगती होईल. उगाचच इतरांचा नकला करण्यात माहीर अशी आपली रास आहे. असलेल्या कलांचा पैशासाठी उपयोग होईल. याचा आज विचार करा नवीन काहीतरी उत्तम गोष्टींची नांदी गणेशाच्या कृपेने आता होणार आहे.

कर्क- भाव, भावना, कोमलता, उगाचच विचार, नाहक त्रास अशा संमिश्र गोष्टींचा आज दिवस आहे. घरामध्ये पाहुण्यांची रेलचेल आहे. त्या उठबशीमध्ये आपल्या मनातील असणाऱ्या अनेक विचारांना बाजूला ठेवले जाईल.

सिंह - धाडसाने अनेक गोष्टी कराल. ज्या गोष्टी कराल त्यामध्ये यश मिळण्याचा आजचा दिवस आहे. प्रवास सुखाचे होतील. नवीन काही गोष्टी यातूनच प्राप्त होतील.

कन्या - लक्ष्मी प्राप्तीचे विशेष योग आज येणार आहेत. आरोग्यम् धनसंपदा. खाण्यावर नियंत्रण ठेवा आणि पैशावर लक्ष ठेवा तर दोन्ही गोष्टी साध्य होतील.

तूळ- आज आपलाच दिवस आहे. आनंदामध्ये स्वतःवर लक्ष केंद्रीत ठेवाल. व्यापार उदिम याच्यासाठी दिवस चांगला आहे. वैश्य वर्णाची आपली रास. काम असेल तर सुख वाटते आज या सर्व गोष्टी सहज घडून येतील.

वृश्चिक- जुन्या काही तब्येतीच्या तक्रारी असतील तर आज त्याच्यासाठी दवाखान्याची वारी होईल. विनाकारण नाहक पैसा खर्च होताना जाणवून येईल. मनस्ताप टाळून या गोष्टी कराव्यात लागतील.

धनु - मित्र-मैत्रिणींच्या सुखाचा आज दिवस आहे. एकत्रित येऊन ऋषिपंचमी हा दिवस साजरा कराल. आपली रास मुळातच जुन्या परंपरांना जपणारी आहे. यातच आनंद मानाल.

मकर - राजकारण आणि समाजकारणात दोन्हीकडे यश मिळण्याचा आजचा दिवस आहे. इतरांची खूप सेवा केल्यामुळे आज यशाचे शिखर गाठले आहे अशी भावना होईल. तरीसुद्धा आपल्या राशीला पडद्याआडची कामे योग्य जमतात. तसेच कराल.

कुंभ - संशोधनात्मक आणि आधुनिक विचार आपल्याला कायमच मांडायला आवडतात. सत्याची कास न सोडता योग्य तिथे पुढाकार घ्याल. धर्म आणि अध्यात्म क्षेत्राचा ध्वज रोवाल.

मीन -शाप आणि उशाप काय आहे, हे आज जाणवेल. विनाकारण न केलेल्या गोष्टींचे खापर किंवा आळ आपल्यावर येतील. शारीरिक मानसिक ताण आणि त्रास आज होतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitin Gadkari : नवीन तंत्रज्ञानाने १० वर्षांत रस्त्यांवर एकही खड्डा पडणार नाही...; गडकरींची भर कार्यक्रमात गॅरंटी

Uday Samant News: पायलटचा टेक ऑफला नकार, उदय सामंतांना करावा लागला कारने प्रवास, नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics : वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, विधानसभेसाठी महायुतीचा गेम प्लॅन ठरला; मुंबईत काय घडलं?

Chandrapur News: चंद्रपुरमधील शाळा अदानींच्या ताब्यात! राज्य सरकारचा मोठा निर्णय; १५ दिवसात व्यवस्थापन बदलण्याचे निर्देश

Viral News: अबब...! तरुणीच्या डोक्यावर चक्क वेटोळे मारुन बसला साप; VIDEO व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले

SCROLL FOR NEXT