Rashi Bhavishya Today 4th May 2024 Saam Tv
राशिभविष्य

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, मेषसह ४ राशींसाठी ‘शनिवार’ भाग्याचा; फक्त 'या' गोष्टीची घ्या काळजी

Rashi Bhavishya Today 4 May 2024: आजचे राशिभविष्य, ४ मे २०२४: मेषसह ४ राशींसाठी ‘शनिवार’ भाग्याचा; फक्त 'या' गोष्टीची घ्या काळजी, वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Satish Daud

दैनिक पंचाग दिनांक ४ मे २०२४

वार - शनिवार तिथी - कृ. एकादशी. नक्षत्र - पू.भा. योग - ऐंद्र करण. बालव‌ रास - कुंभ १६/३८ नंतर मीन. दिनविशेष - ११ प.चांगला

मेष : लाभाची शक्यता आहे

आपली चर रास आहे. फिरायला आपल्याला आवडते. त्यामुळे आज प्रवासासाठी निघाला असाल, तर त्यातून नक्कीच लाभाची शक्यता आहे. एकादशीसाठी विशेष विष्णू उपासना केल्यास अनेक लाभ पदरात पडतील.

वृषभ : जोमाने कामाला लागा

कायमच कष्ट केल्याशिवाय आपल्याला फळ नाही. पण आता काही ग्रहांचे गोचर आपल्यासाठी अनुकूल दिसते आहे केलेल्या कामांचे चीज होईल. करियर मध्ये विशेष सन्मान मिळण्याची शक्यता. त्यामुळे जोमाने कामाला लागा.

मिथुन : विशेष दानधर्म करावा

काही दिवस विनाकारण कामांमध्ये अडथळे अडचणी यांचा सामना आपल्याला करायला लागतो आहे. लवकरच आता या सर्व गोष्टी सुरळीत होणार आहेत. म्हणूनच विशेष दानधर्म करावा आजच्या दिवसासाठी विष्णुसहस्त्रनाम जप केल्यास फायदा नक्की आहे.

कर्क : ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा

हाती घेतलेल्या कामांमध्ये विनाकारण विलंब, आपल्या कामांमध्ये अडथळे, लोकांचे टोमणे, दिरंगाई अशा गोष्टींमध्ये आज गुरफटले जाल असे वाटते आहे. म्हणूनच कामाकडे विशेष लक्ष केंद्रित करून ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा.

सिंह : यश आपलेच आहे

आजच्या आपल्या कामाची पूर्ण रूपरेषा ठरवा आणि त्या पद्धतीने मार्गाला लागा. यश आपलेच आहे. कागदपत्रे, कोर्टकचेरीची काम करत असाल तर जपून करा. व्यवहार करण्यासाठी आजच्या दिवस चांगला आहे. पण आपल्याच मर्जीने पुढे जाऊन आनंद मिळवा.

कन्या : मन शांत ठेवून काम करा

कामात कटकटी, विनाकारण मानसिक ताण- त्रास, तब्येतीमध्ये बिघाड, आपल्या बोलण्यामुळे कोणाला तरी दुखावल्याची भावना, तसेच कामाच्या ठिकाणी दगदग या गोष्टींनी भरलेला आजचा दिवस आहे. आणि म्हणूनच मन शांत ठेवून कामाला झोकून द्या.

तूळ : नकारात्मक गोष्टी कानावर येतील

आपली रास जरीबशुक्राची रास असली तरी सुद्धा विनाकारण चिंता मागे लागल्यासारखे सध्या होत आहे. संततीच्या बाबतीत काही गोष्टी नकारात्मक कानावर येतील. तसेच शेअर मार्केट किंवा लॉटरी यासाठी आजचा दिवस खुपसा चांगला नाही. म्हणून पैशाची मोठी रिस्क घेऊ नका.

वृश्चिक : सर्व पावले जपून टाका

सगळ्यांचे सगळे आपण करता. पण जेव्हा काही आपल्याला मिळण्याची वेळ येते, तेव्हा बरोबर तुमच्याकडून वाईट बोलले जाते किंवा अबोला धरला जातो. म्हणूनच आजचा दिवस कुटुंबीयांशी आज मित भाष्य ठेवा. आपल्याकडून कोणी दुखावणार नाही ना याचा विचार करावा. सर्व पावले जपून टाका.

धनु : यश मिळणार हे नक्की

बहिण भावंडांच्या विशेष सख्याचा आजचा दिवस आहे. आपण जे करतो आहे त्याचे सात्विक समाधान आज मिळणार आहे. कामाला उत्साहाने लागल्याने यश मिळणार हे नक्की. त्यामुळे बेधडक पुढे चला.

मकर : सकारात्मक विचारावर भर द्या

विनाकारण काही गोष्टी डोक्यामध्ये येत आहेत. जुने विचार, जुन्या गोष्टी यांमुळे मन भरकटणार आहे. म्हणूनच सकारात्मक विचारावर आज भर द्या. कुटुंबीय आपल्याकडून दुखावले जाणार नाहीत याचा विचार करा. खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी आज मन:पटलावर येणार आहेत.

कुंभ : आनंद मिळवण्याचा आजचा

बुद्धीला खाद्य मिळवत आनंद मिळवण्याचा आजचा दिवस.आज मन मनासारखे राहील. मनासारखे खाद्य गवसल्याचा विशेष मोद आहे. सर्वांना बरोबर घेऊन आज पुढे चालणार आणि त्याचे श्रेय आपल्याला आज मिळणार आहे.

मीन : यश पदरात पडणार

वाऱ्यासारखी भिरभिर आणि न थांबणारी फरपट यामध्ये आज काम अडले जाणार. म्हणूनच सर्व गोष्टी मनाला येईल तशा करण्यापेक्षा बुद्धीला पटेल ते केल्यास दिवसाचे यश पदरात पडेल हे नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: अनैतिक संबंधात अडसर, बायकोने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला संपवलं; नागपुरमध्ये खळबळ

Beed : ...नाहीतर तुझी बायकोला घरी पाठव, बीडमध्ये व्यापार्‍याने केली आत्महत्या, भाजप नेत्याला अटक

Blue Number Plate: कोणत्या गाड्यांना निळ्या नंबर प्लेट दिल्या जातात आणि का? वाचा त्यामागील खास कारणे

Navi Mumbai : नवी मुंबईतील बस आगारात भीषण आग; नेमकं काय घडलं? | VIDEO

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

SCROLL FOR NEXT