Horoscope Today in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : सावधान! दिवसभरात खर्चाचे प्रमाण वाढते राहणार ; तुमच्या नशिबात आज काय लिहिलं?

Horoscope Today in Marathi : आज काही राशींच्या लोकांचे दिवसभरात खर्चाचे प्रमाण वाढते राहणार आहे. वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलं?

Anjali Potdar

आजचे पंचांग

शनिवार,९ नोव्हेंबर २०२४,कार्तिक शुक्लपक्ष,दुर्गष्टमी, गोपाष्टमी.

तिथी- अष्टमी२२|४६

रास-मकर २३|२८ नं. कुंभ

नक्षत्र- श्रवण

योग- वृद्धि

करण-विष्टिकरण

दिनविशेष-११ नं. चांगला

मेष - शासकीय कामे आज मार्गी लागणार आहेत .तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कामाच्या ठिकाणी बढतीचे योग आहेत. मानसन्मानात भर पडेल.

वृषभ - तुमच्या प्रवासाशी निगडित कामाचा ताण आणि दगदग आहेच. पण गुरुकृपेच्या ओढ्याने या गोष्टी पार कराल. तीर्थक्षेत्री भेट देण्याचे योग आहेत.

मिथुन - कामामध्ये अडथळे आणि अडचणींचा आजचा दिवस आहे. ठरवेल तसे होणार नाही. आजच्या दिवशी आपल्याला संयम बाळगणे खूप गरजेचे आहे. शारीरिक कष्ट वाढतील.

कर्क - आपली मते ठाम असतील आणि त्याविषयी तुम्ही आग्रही राहाल. वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद साधून नवीन ऊर्जात्मक वाटचाल कराल.

सिंह - पैशाशी निगडित अडचणी उद्भवतील. मनस्वास्थ्य खराब राहील. चोर, चोरी यापासून सावधगिरी बाळगण्याचा दिवस आहे.

कन्या- कलाक्षेत्रात आज सुसंधी प्राप्त होईल. जोडीदाराकडून केलेल्या आपल्या अपेक्षा यांना योग्य ती साथ मिळेल. जोडीदाराने केलेल्या गोष्टींचा लाभ पदरात पडेल.

तूळ- प्रॉपर्टीशी निगडित नवीन व्यवहार होतील. नव्याचे जुने, जुन्याचे नवे या उलाढालीमध्ये व्यस्त रहाल. प्रवासासाठी दिवस सुखकर आहे.

वृश्चिक- आपली मते घरातील लोकांकडून विशेष विचारात घेतली जातील. कामाशी निगडित उत्कर्ष दिसतो आहे. यशाचा आलेख उंचावता राहील.

धनु- उत्साह आणि उमेद वाढवणारी एखादी घटना आज आयुष्यामध्ये घडू शकेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहणार आहे. गुंतवणूक योग्य ठरेल.

मकर - आज आपली दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत. आपले आयोजन आणि नियोजन कायमच योग्य असते. आपल्या जवळील लोक आपल्याकडून याचाच आदर्श घेतील.

कुंभ - आपल्या अनमोल वस्तूंची आज दक्षता घ्यावी. वस्तू गहाळ होणार नाहीत ना याची काळजी घ्या. खर्चाचे प्रमाण एकूणच वाढते राहणार आहे. हात सढळ आणि सैल सोडू नका.

मीन - परदेशी व्यवहार, परदेशांशी निगडित लाभाच्या गोष्टी आज घडतील. परदेशी भाषा शिकणे याविषयी आज विशेष आपल्याला ओढ वाटेल. इम्पोर्ट -एक्स्पोर्ट इत्यादी क्षेत्र असतील तर आज प्रगतीचे योग आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chembur Exit Poll: चेंबूर मतदारसंघातून कोण मारणार बाजी? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: कोपरी-पाचपखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे होणार आमदार? पाहा Exit Poll

Wardha Exit Poll: वर्ध्यात भाजपचे पंकज भोयर तिसऱ्यांदा होणार आमदार? पाहा Exit Poll

Maval Exit Poll Result : बंडखोर की विद्यामान, मावळची जनता कुणाच्या मागे? एक्झिट पोलचा अंदाज काय?

Pension: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ८ दिवसांत हे काम करा, नाहीतर पेन्शन विसरा

SCROLL FOR NEXT