Daily Horoscope Today Marathi  Saam TV
राशिभविष्य

Todays Horoscope: काही राशींची आर्थिक अडचण होईल दूर, तर काहींच्या नात्यात होईल वाद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today 6 November 2024 : आज काही राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. तर काहींना दिवसभरात काही अडचणी येण्याची शक्यता आहे.

Anjali Potdar

बुधवार,६ नोव्हेंबर २०२४,कार्तिक शुक्लपक्ष,कड पंचमी, पांडव पंचमी.

तिथी-पंचमी २४|४२

रास-धनु

नक्षत्र-मूळ

योग-सुकर्मा

करण-बवकरण

दिनविशेष- चांगला दिवस

मेष

देवधर्मासाठी प्रवास घडतील मोठ्या प्रवासाचे बेत तुमच्याकडून आखले जातील. मन सकारात्मक राहील. आजूबाजूच्या लोकांना बरोबर घेऊन कामे करावीत .भाग्यकारक घटना घडतील.

वृषभ

इतरांकडून कामाच्या नको त्या कामाच्या जबाबदाऱ्या आज वाढवून घेऊ नका. कदाचित इतरांचे भले करताना आपण वाईट गोष्टीत अडकण्याचे योग आहेत. कलाक्षेत्रातील लोकांना अडचणींचा सामना करावा लागेल.

मिथुन

वैवाहिक जोडीदाराबरोबर हसत खेळत दिवस राहील. एकमेकांना समजून घ्या. कामाच्या बाबतीत कोर्टाची कामे मार्गी लागतील. हलकाफुलका दिवस राहील.

कर्क

आपल्या साध्या स्वभावामुळे इतरांना बरेच वेळा फावते. आज आपल्या शत्रूंकडूनही आपल्याला त्रास होईल. नोकर वर्गापासून सांभाळून राहा आणि आपले जिन्नस सांभाळा.

सिंह

प्रेमाला कशाचे बंधन नसते. स्वच्छंद आणि स्वैर कधीतरी असावे वाटते. आज प्रेमात गुलाबी रंग भरतील. अचानक कानी सुवार्ता येतील. मन आनंदुन जाईल.

कन्या

घरामध्ये पाहुण्यांचे आगमन होईल. त्यांचे ऊठबस करण्यात, आगत्य, आदरातिथ्य करणे यामध्ये धावपळीत दिवस जाईल. आईला विशेष जपण्याचा सल्ला तुम्हाला आहे.

तुळ

पराक्रमांची शर्थ करावी लागेल. पण यश पदरी पडेल. पैशाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे जाल. नवीन स्वप्न रंगवणे आज सहज शक्य होईल आणि लवकरच ती पूर्णत्वात येतील.

वृश्चिक

आपल्या खोचक बोलण्यामुळे कुटुंबीयांची मने दुखावली जाऊ शकतात. कदाचित आज आपले मनस्वस्थ ठीक न राहिल्यामुळे सहज टोचरे बोल निघतील. यासाठी काळजी घ्या धनप्राप्तीसाठी दिवस चांगला आहे.

धनु

स्वतःसाठी वेळ काढा. स्वच्छंदी जीवन जगावे असे वाटेल कदाचित काही गोष्टींची खरेदी कराल. व्यक्तिमत्व उजळून दिसण्यासाठी विशेष प्रयत्न कराल.

मकर

परदेश गमनासाठी तयारी करत असाल तर त्या गोष्टी आज मार्गावरील येतील. अधिक पैसे खर्च करण्याची तयारी ठेवा. कामांमध्ये अडचणी येतील पण सकारात्मक मनोवृत्तीने यावर मात करा.

कुंभ

मित्र-मैत्रिणींचे प्रेम लाभेल. नातेवाईकांबरोबर आणि जवळच्या लोकांना बरोबर स्नेहभोजनाचे योग आहेत. जुने लाभ नव्याने प्राप्त होतील.

मीन

"केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे" अशा गोष्टी आज घडतील. धावपळ, दगदग असा दिवस राहील. पण त्याच गोष्टी कामाचे स्वरूप वाढवून जाईल. एक वेगळा आत्मविश्वास आणि तरतरी आज लाभेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT