Rashi Bhavishya Today 6 May 2024 Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today : मेषसह ५ राशीच्या लोकांनी आज 'या' गोष्टी करणं टाळा; वाचा आजचे राशीभविष्य

Rashi Bhavishya Today 6 May 2024: आजचे राशिभविष्य, ६ मे २०२४: मेषसह ५ राशीच्या लोकांनी आज 'या' गोष्टी करणं टाळा; वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Anjali Potdar

दैनिक पंचांग ६ मे २०२४

वार - सोमवार, तिथी - कृ. त्रयोदशी, नक्षत्र - रेवती योग - प्रीती करण - वणिज रास - मीन २७/४३ नंतर मेष, दिनविशेष - त्रयोदशी वर्ज्य

मेष : चुकीच्या गोष्टी करू नका

परदेश प्रवासास जाण्याची इच्छा असल्यास आज त्याचे बेत अखणी मनात येईल. चुकीच्या गोष्टी करू नका. विनाकारण त्याचे फळ आपल्याला भोगावे लागेल. स्वामी समर्थांची उपासना फलदायी ठरेल.

वृषभ : चांगल्या गोष्टी कानावर येतील

व्यवहाराचे आडाखे पक्के बनतील. संतती निगडित काही चांगल्या गोष्टी कानावर येतील. तब्येत मात्र जपावी.

मिथुन : ऑफिसात दिवस चांगला जाईल

पुस्तक खरेदी, वैचारिक चर्चा, ऑफिसमधील सहकारी यांबरोबर आजचा दिवस वेगळ्या पद्धतीने अनुचारला जाईल. "करावे तसे भरावे" या उक्तीप्रमाणे सर्व अलबेल होईल.

कर्क : योग्य ठिकाणी पैसा खर्च होईल

भावना आणि भावनांचा सागर आज ओतप्रोत दाटेल. देवधर्म, अध्यात्म याविषयी मान्यवरांशी चर्चेचा दिवस. योग्य ठिकाणी पैसा खर्च होईल. आणि त्याचा आनंद होईल.

सिंह : सतर्कतेने पावले उचला

विनाकारण कोणीतरी आपल्याला सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करेल. पण आज तुम्ही अलर्ट रहा. सतर्कतेने पावले उचला. उगाचच धावपळ टाळा.

कन्या : दिवस मनासारखा राहील

कोर्ट कचेरी, मोठे व्यवहार, व्यवसायाच्या गोष्टी याकडे विशेषत्वाने महत्त्व द्या. लक्ष द्या. कुठे योग्य आणि अयोग्य समतोल साधून पावले उचलल्यास दिवस मनासारखा राहील.

तूळ : विचाराने मन सैरभैर होईल

उगाचच सुरू असणारी मनाची घालमेल आज टोकाच्या निर्णयापर्यंत जाईल. मानसिकता जपा. उगाचच नकारात्मक विचाराने मन सैरभैर होईल. त्यामुळे तब्येतीच्या तक्रारी वाढतील.

वृश्चिक : कठोर निर्णय घेणे टाळा

तशी भावनिक असणारी आपली रास. आज काही गोष्टी संतती बाबतीत विचार करण्यास लावणाऱ्या ठरतील. कोणत्याही गोष्टींसाठी कठोर निर्णय घेण्याचे टाळा.

धनु : पाहुण्यांची सरबराई राहील

पाहुण्यांची सरबराई राहील. तरी सुद्धा केलेल्या कामात यश मिळेलच असे नाही. विनाकारण आपल्या मागे बोलणारे लोक यामुळे त्रास होईल.

मकर : दिवस आनंदी राहील

लेखनाची आवड असेल तर आज नवीन गोष्टी सुचून त्यामध्ये वेगळी सुरुवात होईल. पुस्तक वाचन, लेखन आणि इतर गोष्टी मनासारख्या केल्यामुळे दिवस आनंदी राहील.

कुंभ : कुटुंबीयांसाठी वेळ द्या

उगाचच काहीतरी नवीन खावे - प्यावे एकत्र उठावे - बसावे असे भाव मनात राहतील. आणि म्हणून कुटुंबीयांसाठी वेळ द्या. तो नक्कीच सत्कारणी लागेल.

मीन : काहीतरी वेगळे करण्याची ऊर्जा मिळेल

माशा प्रमाणे खोल सरोवरासारखी, समतोल व भावनेनं ओथंबलेली आपली रास. काहीतरी वेगळे करण्याची ऊर्जा आज राहणार आहे. आणि त्यामुळे "प्रेमाने जग जिंकता येते" हे आज समजून जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: कोणत्या ग्रहावर एक दिवस पृथ्वीच्या एका वर्षाच्या कालावधीइतका असतो?

Hinjawadi Traffic : हिंजवडी, मुळशीच्या वाहतूक कोंडीची कटकट संपणार, PMRDA नं आखला प्लान, ३ रोड कसे असतील?

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Maharashtra Politics: पावसाळी अधिवेशन सोडून एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी; अचानक गृहमंत्र्यांच्या भेटीमागील कारण काय?

Tejashri Pradhan: प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान किती वर्षाची आहे? वय वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT