Horoscope Today Marathi  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : प्रेमामध्ये यश मिळेल, अचानक धनलाभ होईल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 05 September 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस आरोग्य, नोकरी , व्यवसाय आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? जाणून घ्या आजचे राशीभविष्य.

Anjali Potdar

आजचे पंचाग

गुरुवार,५ सप्टेंबर २०२४,भाद्रपद शुक्लपक्ष.

तिथी- द्वितीया १२|२२

रास- कन्या

नक्षत्र- हस्त

योग- शुभयोग

करण-कौलव

दिनविशेष-शुभ दिवस

मेष - गाडी किंवा तत्सम अपघात पासून स्वतःला जपण्याचा आजचा दिवस आहे. त्याबाबत विशेष काळजी घ्या. डोक्याला कफन बांधून कामे होणार नाहीत. "चोरावर मोर होऊन राहावे लागेल".

वृषभ - दिवस आनंदी आणि चांगला असेल.नवीन गोष्टी सकारात्मक घडतील. धर्म, अध्यात यामध्ये प्रगती होईल. पैसे खर्च होतील पण योग्य ठिकाणी मार्गी लागतील. दानधर्म वाढेल.

मिथुन - तब्येतीच्या तक्रारी असतील तर आज नव्याने चांगले डॉक्टर मिळतील.योग्य औषधे यांच्यातर्फे लागू होतील. थोडे प्रवासाचे योग दिसत आहेत. करियर साठी यशस्वी वाटचाल होईल.

कर्क - आपल्या लोकांसाठी काहीतरी करावे असे वाटेल. त्याविषयी भावनाही दाटून येतील. इतरांचे आदरातिथ्य आणि आगत्य कराल.आनंदाने स्नेहभोजनाचे योग आहेत.

सिंह - आपल्या सगळ्याच गोष्टी आणि विचार पुढे दामटून नेहमीच चालत नाही. मनस्ताप टाळा. विनाकारण होणाऱ्या त्रास आणि कटकटी यामुळे तब्येतीचे नुकसान आज होऊ शकते. त्याविषयी खर्च संभवतो आहे.

कन्या -सलज्ज, शांत, संकोची अशी आपली रास आहे. आज आपण आपल्या स्वतःमध्येच धुंद राहाल. नव्याने पुढील स्वप्नांची आखणी करावी. आपले आकर्षक व्यक्तिमत्व अजूनच आज खुलून येईल.

तूळ - विवंचनेतून बाहेर पडण्याचा आजचा दिवस आहे. पैशाची आवक चांगली राहील. एकूणच दिवस प्रफुल्लित असेल. वडिलोपार्जित प्रॉपर्टीचे आज न्यायनिवाडा होईल.

वृश्चिक - शांत आणि धीरगंभीर टाकलेली पावले नवीन वाटा पदाक्रांत करतील. यश हे आपल्या नसानसात आज भिनलेले असेल "लाथ मारेल तिथे पाणी काढाल" असा दिवस आहे.

धनु- घरी धार्मिक कार्याचे योग आहेत. सर्वांबरोबर दिवस आनंदात जाईल. धावपळ वाढेल पण मनाला एक प्रकारची शांतता देऊन जाणारा आज दिवस आहे.

मकर - काही गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कष्टाचा पैसा आहे योग्य ठिकाणीच गुंतवा. प्रेमामध्ये यश मिळेल. शिव उपासना लाभदायी ठरेल.

कुंभ - आपले कनिष्ठ सहकारी आपल्याकडून प्रेरणा घेतील. नवीन गोष्टी कामाच्या बाबतीत आपल्याकडून घडतील. संशोधनावर भर राहील. कटकटी वाढतील पण तो कामाचाच एक भाग असेल. तब्येत जपा.

मीन- व्यवसायिक भागीदाराच्या काही कल्पना आपल्याला भावतील. त्याच पद्धतीने कामाची आखणी कराल. दोघांचा योग्य समन्वय व्यापार वृद्धीकडे घेऊन जाणारा राहणार आहे. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng Lord Test : जे सचिन-विराटला जमलं नाही, ते केएल राहुलनं करुन दाखवलं, पठ्ठ्यानं लॉर्ड्सचं मैदान गाजवलं

जगात मुस्लीम लोकसंख्येचा विस्फोट,भारत होणार लोकसंख्येत मोठा मुस्लीम देश? देशात हिंदू लोकसंख्या किती?

मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे राजकारणाच्या मैदानात,यशश्री लढवणार वैद्यनाथ बँकेची निवडणुक

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

SCROLL FOR NEXT