बुधवार,२० नोव्हेंबर २०२४,कार्तिक कृष्णपक्ष.
तिथी-पंचमी १६|५०
रास-मिथुन ०८|४७ नं. कर्क
नक्षत्र- पुनर्वसु
योग- शुभयोग
करण-तैतिल
दिनविशेष-उत्तम दिवस
मेष - आपली सतत active असणारी रास आजपर्यंत केलेल्या कामाचे फळ मिळण्यासाठी तयार आहे. अनेक लाभ झोळीत पडतील. वेगळे धाडस आणि सहज करावेसे वाटेल.
वृषभ - "जीवन गाणे गातच जावे झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे" हे ब्रीद आज वापरले तर दिवस चांगला जाऊ शकेल. विनाकारण मनस्ताप टाळा. वर्तमानात रहा.
मिथुन- "मी कशाला आरशात पाहू ग मी कशाला बंधनात राहू ग मीच माझ्या रुपाची राणी ग" असा दिवस आहे. स्वतःचा आत्मविश्वास वाढीला लागेल. दिवस आनंदी राहील.
कर्क - "क्यौं पैसा पैसा करतां हैं तू पैसें पे क्यूं मरता हैं" असा आजचा दिवस आहे. पैशाची किंमत आज कळेल. गुंतवणुकीच्या दृष्टीने दिवस फायदा घेऊन आलेला आहे.
सिंह - "बाजूऔंमें दम हैं, तों फिर काहें का गम हैं" असा दिवस आहे. स्वतःच्या महत्त्वाकांक्षा वाढीस लागतील. त्या पद्धतीने पावले उचलाला आणि यशस्वी व्हाल. जवळचे प्रवास घडतील.
कन्या - "स्वर्ग से सुंदर सपनों से प्यारा हैं अपनां यें घर" अशी भावना होईल. घरी पाहुण्यांचा मान होईल. स्वस्थ मन त्यामुळे दिवस चांगला राहील. गृहसौख्य, वाहन सौख्याच्या दृष्टीने दिवस छान आहे.
तूळ - "प्रेमा काय देऊ तुला भाग्य दिले तू मला" असा दिवस आहे. मनाला सोनेरी पंख फुटतील. दिवस आनंदी राहील. अनेक सुवार्ता कानावर येतील.
वृश्चिक - "सोचानां क्यां जो भी होगां देखा जायेगा" असाच दिवस आहे. अडचणी, कटकटी असतील पण त्यातून मार्ग काढाल. गुप्त शत्रूंवर मात करावी लागेल.
धनु - "तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं" अशी भावना आज येईल. एकमेकांसाठी एक काडीकाडी जमवून केलेल्या संसारात आनंद शोधाल. आणि तो मिळेल. नवीन स्वप्न रंगवाल.
मकर - "जिंदगी प्यार का गीत हैं इसें हर दिल को गाना पडेगा" स्वतः वर विश्वास ठेवून पुढे जाल. अडचणींशी दोन हात करावे लागतील. शारीरिक कष्ट आणि मेहनत वाढेल.
कुंभ - "भगवान देता हैं, तो छप्पर फाडकें "असा दिवस आहे. शुभ उपासना फायदेशीर ठरेल. भाग्यकारक घटना अनुभवास येतील.
मीन - "सुबह और शाम काम हीं काम" असा धावपळीचा दिवस आहे. ठरवलेल्या गोष्टी मनाप्रमाणे घडतील. मानसन्मान प्राप्त होतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.