राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. विधानसभा निवडणुकीत विविध मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. विधानभा निवडणुकीच्या मतदानानंतर आता एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. यवतमाळमधील दिग्रस मतदारसंघातून शिंदे गटाचे संजय राठोड हे विजयी होण्याची शक्यता आहे.
दिग्रसमधून संजय राठोड हे संभाव्य आमदार आहेत. दिग्रसमध्ये शिंदे गट विरुद्ध माणिकराव ठाकरे अशी लढत पाहायला मिळणार आहे. फार पूर्वीपासूनच हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघातून संजय राठोड निवडून येऊ शकतात.
दिग्रस मतदारसंघात विद्यमान पालकमंत्री संजय राठोड आणि माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांच्यात लढत होणार आहे. या दोघांमध्ये अटीतटीची लढत होणार आहे. संजय राठोड यांच्यासोबत अनेक लोक आहे. संजय राठोड निवडून येतील,असं पदाधिकाऱ्यांचे म्हणणं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.