Horoscope Today Marathi  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Anjali Potdar

आजचे पंचाग

शुक्रवार,२० सप्टेंबर २०२४,भाद्रपद कृष्णपक्ष,

तृतीया श्राद्ध.

तिथी- तृतीया २१|१६

रास-मेष

नक्षत्र- अश्विनी

योग-ध्रुव

करण-वणिज

दिनविशेष- ११ प.चांगला

मेष - प्रगतीच्या वाटा आज नव्याने साद घालेल. काम करण्याचा हुरूप येईल. शरीर आणि बुद्धी एकत्र चालल्यामुळे काम पूर्णत्वास जाईल. आजचा दिवस छान राहील. उत्साहावर्धक घटना घडतील

वृषभ - लांबचा प्रवास होण्याचा आज योग आहे किंवा परदेश गमनाचे काही बेत आखणार असाल तर त्या गोष्टी यशस्वी पार पडतील असे दिसते आहे. मोठ्या गोष्टी अंगावर घेतल्यामुळे मनस्ताप सुद्धा संभवतो आहे.

मिथुन - अवघड गोष्टी सोप्या करण्यासाठी आज कुठेतरी दूत म्हणून उपस्थित राहावे. आपल्या बोलण्याचा प्रभावामुळे नात्यांमध्ये समेट घडण्याची शक्यता दिसते आहे. आजच आनंदाचा दिवस आहे.

कर्क - मोठी स्वप्न बघताना मोठ्या लोकांबरोबर वावरावे लागते. काही गोष्टी आणि ऊर्जा इतरांकडून घ्याल आणि आपल्या कामांमध्ये पेरणी करून त्याच कामाचा मोठा वृक्ष तयार होईल.

सिंह - काहीतरी वेगळे आणि धाडसी करण्याचे आज मनात येईल, द्रुतगती प्रवास होईल. वेगाने गाडी चालवणे काहीतरी थ्रिलिंग करा अशी भावना येईल. भटकंती वाढेल पण अर्थात ती शरीराची असेल मनस्वास्थ्य मात्र स्थिर राहील.

कन्या - धावपळीचा दिवस राहील. शरीर थकून जाईल, पण काही वेळेला मन निश्चित राहण्यासाठी कामात व्यग्रच असलेले चांगलं, हे आपल्याला नेहमी जाणवतं. आज असाच व्यस्त दिवस राहील.

तूळ - व्यावसायिक जोडीदाराबरोबर काही नवीन गोष्टींचे नियोजन करावे. नव्या कल्पना आपल्या व्यवसायामध्ये येतील. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने दोन पावले पुढे टाकाल. कोर्टाची कामे मनाप्रमाणे होतील.

वृश्चिक - निश्चित गुप्तरोग पोटाचे आजार त्रास देऊ शकतात. बाहेरचे खाणे शक्यतो टाळावे.

धनु - प्रेमा काय देऊ तुला? भाग्य दिले तू मला अशी भावना होईल. जोडीदाराबरोबर खूपच तरल भावना मनामध्ये दाटून येते. प्रेम प्रकरण यशस्वी होते, गुलाबी दिवस साची रंगत उत्तर उत्तर चढत राहील.

मकर - घर जुनं असेल तर काही त्याच्यामध्ये बदल किंवा रिनोवेशन करावी असे भावना मनामध्ये येईल. गोष्टी ठरवून आणि अजित कराल. मात्र खर्चावर आळा घालणे गरजेचे आहे.

कुंभ - शेजाऱ्यांकडून काहीतरी सुवर्ता मिळेल, त्यांच्याशी गणेशच्या संबंध प्रस्थापित होते. एकमेकांच्या सहकार्याने पुढे वाटचाल कराल, छोटे प्रवासाचे योग छोट्या सहलीचे योग दिसत आहे.

मीन - गुंतवणुकीसाठी दिवस योग्य आहे. पैसे वाढण्याच्या दृष्टीने कुटुंबीयांचे मार्गदर्शन घ्या, त्यांचा सल्ला ज्येष्ठांचा सल्ला आपल्याला योग्य ठरेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT