शुक्रवार,१२ सप्टेंबर २०२५,भाद्रपद कृष्णपक्ष,षष्ठी श्राध्द.
तिथी-पंचमी ०९|५९
रास-मेष १७|३१ नं. वृषभ
नक्षत्र-भरणी
योग-व्याघात
करण-तैतिल
दिनविशेष-१२ प. चांगला
"चलती का नाम गाडी" असा काहीसा दिवस आहे. व्यस्तता वाढती राहील. नवनवीन संकल्पना व्यवसायाच्या बाबतीत येतील. मात्र "जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ" ठेवून वागणे आज गरजेचे आहे.
सोसाटच्या वाऱ्यामध्ये जशी पानगळ होते तशा काही इच्छा गोष्टी आज तुमच्या आयुष्यात होणार आहेत. नको असलेल्या गोष्टी निघून जातील. पण त्याचा मनस्ताप करू नका. कारण पैसा, खर्च, बंधनयोग आज येतील.
सोनसळी असा दिवस आहे. सुवर्ता यांची बरसात होईल. आपण केलेले कर्म आपल्याबरोबर येते हे आज खास करून जाणवेल. नात्यांमध्ये पैशाशी निगडित लाभ आज होणार आहे.
आपल्या राशीला असणारा भावनिक आणि प्रेमळ स्वभाव आज कामाच्या ठिकाणी सुद्धा सर्वांना घेऊन जाईल. आपण मिळवलेल्या समाजातील चांगल्या लोकांमुळे आपला मानसन्मान, पद वाढणार आहे.
शक्य असेल तितकी उपासना आज करा. धार्मिक गोष्टींमध्ये सहभाग होईल. तीर्थयात्री भेटी होतील. राजकारणामध्ये आपला झेंडा तुम्ही आज रोवणार आहात. दिवस उत्तम आहे.
नको असलेल्या ठिकाणी हिशोब करणे आणि हव्या असणाऱ्या ठिकाणी बेहिशोबी राहणे आज करू नका. कुठल्याही कामाच्या बाबतीत गल्लत आज नको. विनाकारण कटकटी वाढण्याची शक्यता आहे.
जे असेल ते स्वीकारून आज पुढे जावं लागेल. कामांमध्ये यश मिळेल. पण इतरांच्या सल्ल्याने किंवा मताने कामे केल्यास बरे राहील. कोर्टाच्या कामामध्ये यश मिळेल.
सातत्याने परिस्थितीशी झुंज देणे आता आपल्याला अवघड जाते आहे. आज मात्र दिवस संमिश्र आहे. आजही निकराची लढत द्यावी लागेल. पण याचे पर्यावसन यशामध्ये होणार आहे हे लक्षात घ्या.
आपली संतती हीच आपल्यासाठी संपत्ती आहे हे, आपण जाणून आहात. त्यांच्या यशासाठी, प्रगतीसाठी विशेष मेहनत आज घ्यायला दत्तगुरूंची कृपा आपल्यावर राहणार आहे. धनयोग चांगले आहेत.
जुन्याचे नवे करण्याचा आजचा दिवस आहे. मग घर असो, आजूबाजूचा परिसर किंवा नाती. दिवसभर कामांमध्ये व्यस्तता राहील. घरातील ज्येष्ठांच्या आशीर्वादाने यशाकडे वाटचाल कराल.
व्यवसायामध्ये भाग्योदय कारक घटना आज घडणार आहेत. भावंडांच्या सौख्यमुळे पुढे जाल. सांधेदुखी व कानाशी निगडित आजार मात्र आज जपावे लागतील. काळजी घ्या.
आपल्यामध्ये रुजलेले संस्कार कुटुंबीयांना विशेष भावतात. काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आज कुटुंबामध्ये तुम्हाला पेलाव्या लागतील. पण त्या लीलया संभाळाल. धनाचा राबता चांगला राहील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.