मंगळवार,२६ ऑगस्ट२०२५,भाद्रपद शुक्लपक्ष,हरितालिका तृतीया,साम श्रावणी.
तिथी-तृतीया १३|५५
रास-कन्या
नक्षत्र-हस्त
योग-साध्य
करण-गरज
दिनविशेष-उत्तम दिवस
सणाच्या आरंभाची सुरुवात कायमच धावपळीची असते. आज हरितालिका आहे आणि गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे. आपल्या ताकतीपेक्षा अधिक गोष्टी आज कराव्या लागणार आहेत. कदाचित स्वतःला पुढे घेऊन जायला लागेल.
शिव उपासना, शक्ती उपासना आज तुम्हाला फलदायी ठरणार आहेत. तीर्थक्षेत्रि भेटी होतील. चांगल्या वार्ता कानावर आल्यामुळे मन प्रसन्न राहील. नियोजित गोष्टी तशाच होतील.
नवनवीन आव्हाने घेऊन कामाला लागाल. सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे पुढे जाण्याचे योग आहेत. सासरवाडीकडून विशेष फायदा संभवतो आहे. दिवस चांगला आहे.
नवनवीन आव्हाने घेऊन कामाला लागाल. सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे पुढे जाण्याचे योग आहेत. सासरवाडीकडून विशेष फायदा संभवतो आहे. दिवस चांगला आहे.
आयुष्य हे स्वतःसाठी जगायचं असते. आनंदासाठी जगायचं असते हे आपल्या राशीला चांगलेच माहिती आहे. लोकांना यथोचित मान देऊन आपणही आनंद संपादन नेहमीच करता. असाच आजचा दिवस सर्व प्रकारचे लाभ घेऊन आलेला आहे.
कुठेतरी उगाच मोठेपणा दाखवायला जायचे किंवा कधी कधी अतिउदार स्वभाव दोन्ही मुळे आज तुम्ही गोत्यात येण्याचा संभव आहे. सजग राहून आज काम करणे गरजेचे आहे. मनस्वास्थ्य सांभाळा.
हरतालिकेचा दिवस आहे. एक नव्याने उत्साह आज दिवसभरात तुमच्या राशीला राहणार आहे. आरोग्य उत्तम राहील. देवधर्माबरोबरच आपल्या आवडीची कामे करण्यात दिवस व्यस्त राहील.
धनलाभ चांगले आहेत. पैशाचा हिशोब किंवा वैश्य प्रवृत्तीची आपली असणारी रास अजून धडपडीने दोन कमावण्याच्या मागे आज लागणार आहात. नातेवाईकांच्याकडून सहकार्य चांगले मिळेल.
भावंड सौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. एखादी गोष्ट नव्याने करण्याचा मानस आपल्याकडून राहील. त्याला आपल्या जवळच्या लोकांचे, शेजाऱ्यांचे भावंडांचे सहकार्य मिळेल. जवळचे प्रवासही होतील.
गृह सौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. सणाच्या निमित्ताने घरी सर्वजण एकत्रित येणे छोटासा उत्सव साजरा करणे अशा गोष्टी घडतील. धार्मिक कार्यामध्ये हिरीरीने सहभाग घ्याल.
शेअर्समधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. लांब आणि मोठ्या मुदतीच्या गुंतवणुकीमध्ये तुम्ही सरसावाल. इतरांना आपला सल्ला मोलाचा ठरेल. सृजनशीलता वाढेल.
तब्येतीच्या जरा तक्रारी राहतील. दुर्लक्ष करून चालणार नाही. कामामध्ये मात्र अडचणी आल्या तरी सर्वांवर मात करून जाल. उगाच एखाद्या गोष्टीचा अधिक खोलात जाणे आज टाळा.
जोडीदाराच्या भावना समजून घेऊन आज वागावे लागेल. प्रेमातून लाभ होतील. व्यवसायिक उत्कर्ष आणि उत्कर्षाच्या दिवशीने दृष्टीने दिवस चांगला आहे. काळजी नसावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.