horoscope  Saam tv
राशिभविष्य

Horoscope: आयुष्यात घडतील आश्चर्यकारक गोष्टी; व्यवसायात दुप्पट प्रगती, वाढेल आदर,जाणून घ्या राशीभविष्य

Sunday Horoscope In Marathi : आठवड्याचा अखेरचा दिवस अनेकांसाठी आश्चर्यकारक गोष्टी घडवणार असेल. संपत्ती, जमीन, प्रेमबाबत आनंदाची बातमी ऐकू येणार आहे. चला तर जाणून घेऊ आजचे राशीभविष्य.

Anjali Potdar

रविवार,२४ ऑगस्ट२०२५,भाद्रपद शुक्लपक्ष.

तिथी-प्रतिपदा ११|४९

रास-सिंह

नक्षत्र-पूर्वा

योग-शिव योग

करण-बवकरण

दिनविशेष-चांगला दिवस

मेष

विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. नवनवीन कल्पनाने दिवस व्यापलेला असेल. कला, चित्रकला, शिल्पकला यासारख्या गोष्टींमध्ये विशेष प्रगती होईल. शेअर्स आणि लॉटरीमध्ये आज नशीब आजमावायला हरकत नाही.

वृषभ

आयुष्य जगायचे तर रसिकतेने जगायला आपल्याला आवडते. सर्व सुखाची, अर्थत्वाची असणारी आपली रास आहे. आजचा दिवस मात्र मातृसौख्य, वाहन सौख्य, शेतीवाडी गृहसौख्य या दृष्टीने चांगला आहे.

मिथुन

लेखक, वक्ते, प्रकाशक वेगळे धाडसाने धडाडीने काम करण्यासाठी आजचा दिवस आपल्या राशीला चांगला आहे. जवळच्या प्रवासातून फायदा संभवतो आहे.

कर्क

एकत्र कुटुंबात राहताना अनेक वेळा तडजोड करावी लागते. आज अशा काहीशा गोष्टी आपल्याला करावे लागतील घरातील वरिष्ठांच्या सल्ल्याने वागाल. वारसा हक्काचे संपत्ती बाबत दिवस आनंदी घटना घेऊन आलेला आहे.

सिंह

आपल्यामधील असलेले कला गुण आज बहरतील. इतरांना अश्वस्त करण्याचा आजचा दिवस आहे. आपल्या राशीतील मुळातच दिलदारपणा, उदारपणा यामुळे आपल्या भोवती एक सकारात्मक वलय तयार होईल. दिवस आनंदी आहे.

कन्या

आपले महत्त्वाचे ऐवज आणि जिन्नस आज सांभाळणे गरजेचे आहे. गहाळ होणे चोरी होणे विनाकारण मनस्ताप वाढणे अशा गोष्टी आज घडतील. काळजी घ्यावी.

तूळ

मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात आपल्या आवडत्या लोकांबरोबर दिवस कसा गेला हे आज कळणारच नाही. सणासुदीच्या पूर्वार्धामध्ये धमाल गोष्टींची पेरणी करत आजचा दिवस आलेला आहे.

वृश्चिक

समाजामध्ये आपली एक चांगली ओळख आणि पत आहे. आपले कार्यक्षेत्र रूंदावणार आहे. अनेक जणांची कामे एकट्यानेच करण्याची आपली हातोटी आज कामी येईल. कामाचा उच्चांक गाठला जाईल.

धनु

स्वतःवरचा विश्वास हा प्रगतीसाठी जास्त योग्य असतो. पण त्याचबरोबर भाग्याची जर उत्तम साथ मिळाली तर वेगाने प्रगती होते. आजच्या दिवशी अशाच काही घटना आयुष्यात घडतील ज्या आश्चर्यकारक ठरतील. सद्गुरु कृपा राहील.

मकर

काखेत कळसा आणि गावाला वळसा असा काहीसा दिवस आहे. सोप्या गोष्टी ज्या हाकेच्या अंतरावर आहेत या विनाकारण क्लिष्ट होऊन बसतील. पण दिवसाच्या शेवटी सर्वकाही अलबेल आहे ही जाणीव होईल.

कुंभ

प्रेमाला उपमा नाही असा दिवस आहे. जोडीदाराबरोबर उत्तम काळ आज व्यतीत कराल. काही न पटणाऱ्या गोष्टी सुद्धा आज सहज कराल. व्यवसायाच्या बाबतीत नवनवीन कल्पना आणि संकल्पना यामुळे प्रगतीपथावर रहाल.

मीन

एकमेका सहाय्य करू असा दिवस आहे. इतरांच्या अडचणी सोडवता सोडवता तुम्ही अडचणीत न येता त्यातून मार्ग दिसेल. मात्र वेगवेगळी आव्हाने आज पेलावी लागतील. गुप्तशत्रूंचा त्रास संभवतो आहे. काळजी घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hartalika Vrat 2025 : हरतालिका व्रत का केला जातो? जाणून घ्या पौराणिक कथा

भारतातील 'या' जागा आहे भयानक; येतात विचित्र आवाज

Maharashtra Live News Update: जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी एक क्विंटलचा फुलांचा हार

Taloda News : मृत्यूनंतरही यातना संपेना; पूल नसल्याने वाहत्या पाण्यातून मृतदेह नेण्याची वेळ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा जोरदार इशारा; विरोधकांनो, शिवसेना कधीही फुटणार नाही|VIDEO

SCROLL FOR NEXT