horoscope  Saam tv
राशिभविष्य

Thursday Horoscope: गुरुचा आशीर्वाद लाभणार; ५ राशींना होणार धन लाभ, अडचणी होतील दूर; कसा असणार गुरुवारचा दिवस जाणून घ्या

Thursday Horoscope In Marathi: गुरु ग्रहाचे विशेष आशीर्वादाने अनेकांना धन लाभ होईल. तर काहींचे संकट दूर होईल. वाचा सर्व १२ राशींच्या जातकांसाठी कसा असा असेल आजचा दिवस.

Anjali Potdar

गुरुवार,२१ ऑगस्ट २०२५,श्रावण कृष्णपक्ष,शिवरात्रि,गुरुपुष्यमृत.

तिथी-त्रयोदशी १२|४५

नक्षत्र- पुष्य २४|०९

योग-व्यतिपात

करण-वणिज

दिनविशेष-त्रयोदशी वर्ज्य

मेष

आपले प्रॉपर्टीचे व्यवहार शेतीवाडी अशा बाबतीत आज काहीतरी महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस सुद्धा गुरुपुष्यामृत योग. चांगल्या गोष्टी करण्यासाठी नक्की याचा फायदा घ्या. कुटुंबीयांच्या सहकार्याने पुढे जाल.

वृषभ

बहिणीची विशेष माया मिळेल. एकमेकांच्या मताने प्रगती करण्याचा आजचा दिवस आहे. क्षितिजाच्या पलीकडच्या अशा काही गोष्टी करावे असे वाटेल. मनोरंजन क्षेत्रामध्ये विशेष मिळण्याचा दिवस आहे. वक्तृत्व बहरेल.

मिथुन

आज गुरुपुष्यामृत योगावर सोने खरेदी करण्यासाठी उत्तम योग आपल्याला आहे. आपल्या राशीला विशेष सुवर्ण खरेदीचे लाभ होणार आहेत. धनाची आवकजावक सुद्धा चांगली राहिल्यामुळे मानसिकता उत्तम राहील.

कर्क

आज मनोवांछींत गोष्टी मिळणारा दिवस आहे. गुरुपुष्यामृत योगाचे विशेष संधी तुमच्या राशीला आहे. जे ठरवाल ते कराल. गुरु ग्रहाचे विशेष आशीर्वादाने पुढे जाल. मोठ्या गोष्टींची आव्हाने घ्यायला हरकत नाही. दिवस चांगला आहे.

सिंह

ठरवलेल्या गोष्टी तशाच घडताना दिसतील असे वाटत नाही. कुठेतरी मनाला मुरुड घालून गोष्टी अड्जस्ट करावे लागतील. आपल्याला सुखदुःख समे कृत्वा| असा दिवस आहे. जे आहे ते जर नव्या दृष्टीने पाहण्याची सवय नसेल हातात विशेष काही राहणार नाही.

कन्या

बोलून समोरच्याचे मन जिंकणारी आपली बुद्धीवादी अशी रास आहे. आज नव्याने काही परिचय होतील. जुन्या भेटीगाठी होतील. दिवस आनंदाचे पेरणी करायला आलेला आहे. याचा लाभ घ्या.

तूळ

इतरांचे करता करता आपले बाजूला राहते असे आपल्याला बरेचदा वाटते. आज करिअरकडे विशेष लक्ष द्या. आपल्या कार्यक्षेत्रात आघाडीवर जाण्याचा आजचा दिवस आहे. अर्थात वरिष्ठ आणि कनिष्ठ यामधील ताळमेळ आपल्याला साधून पुढे जावे लागेल.

वृश्चिक

कुलस्वामिनीची उपासना आज आपल्याला चांगली ठरणार आहे. नवनवीन गोष्टींसाठी संधी येतील. या संधीचे सोने करण्याचा आजचा दिवस आहे. अध्यात्मिक आणि उपासना मार्गांमधून मनाची उंची गाठाल.

धनु

आपले इतरांना पटवून देण्यापेक्षा तुमच्या गोष्टी तुम्हाला तरी पटायला हव्यात. निर्णय घेतल्यावर ठाम रहा आणि एकटे का असेना पुढे जा. इतरांच्या सहकाऱ्यांची मदत न करता अपेक्षा न करता आज कामे करावी लागतील. दिवस बरा आहे.

मकर

जोडीदाराबरोबर अबोला संभवतो आहे. छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होत असतील तर आज अबोला हे शस्त्र घेणं बरे आहे. अर्थात ह्या लूटपुटूच्या गोष्टी असतात. समजून घेण्याची प्रवृत्ती दोन्हीकडे असेल तर संसार करायला आनंद होतो. व्यवसायामध्ये मात्र कष्टाने यश खेचून आणाल.

कुंभ

नोकरीमध्ये बढती मिळेल. धावपळ दगदगीचा आजचा दिवस आहे. सर्व गोष्टी करताना जपून करा. एखादे सावज टप्प्यात आल्यासारखं शत्रू टपून बसलेले आहेत. कोणती गोष्ट चुकीच्या मार्गाने आज होऊ देऊ नका. गोष्टी अंगलट येतील.

मीन

आज गुरु पुष्यामृतासारखा शुभ दिवस आपल्या राशीला भरभराट घेऊन आलेला आहे. दत्तगुरूंची उपासना करावी. त्यांचे विशेष आशीर्वाद आज आपल्याला मिळणार आहेत. सुवर्ण खरेदी, दागिने खरेदी चांगली गुंतवणूक याच्यासाठी आजचा दिवस सुवर्णमयीचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Old Railway Tickets Viral: 'आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात' रेल्वेच्या जाड पुठ्यांची तिकीटे पाहून तुम्हीही व्हाल भावूक

Maharashtra Live News Update : बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

लेकीचा लग्नास नकार, वडिलांनी झोपेतच मुलीला संपवलं; नंतर स्वत: नस कापली; हिंगोलीत खळबळ

Nashik Accident : बाळंतपणासाठी माहेरी आली येताच घडले दुर्दैवी; रस्ता ओलांडताना ट्रकने चिरडले, मायलेकींसह जन्मापूर्वीच बाळाचाही मृत्यू

Hartalika Vrat: मासिक पाळीदरम्यान हरतालिका व्रत करता येते का? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT