Sun Saturn Conjunction In Pisces saam tv
राशिभविष्य

Surya-Shani Yuti: होळीमध्ये शनीची शत्रू ग्रहाशी होणार युती; 'या' राशींवर संकटांचे ढग, मोठी हानी होणार

Sun Saturn Conjunction In Pisces: 2025 मध्ये शनी, राहू, केतू आणि गुरु हे चार मोठे ग्रह आपली राशी बदलणार आहेत. या ग्रहांच्या राशी बदलामुळे अनेक राशीच्या लोकांना खूप फायदा होईल.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, एक विशिष्ट काळानंतर सर्व ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी सर्व 9 ग्रह त्यांच्या राशी आणि नक्षत्र बदलतात, जे ज्योतिषशास्त्रात खूप महत्वाचं मानलं जातं. 2025 मध्ये शनी, राहू, केतू आणि गुरु हे चार मोठे ग्रह आपली राशी बदलणार आहेत. या ग्रहांच्या राशी बदलामुळे अनेक राशीच्या लोकांना खूप फायदा होईल.

ज्योतिष्य गणनेनुसार शनिदेव सध्या कुंभ राशीत आहेत. 29 मार्च रोजी शनिदेव कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन राशीत शनिदेवाच्या गोचरमुळे मकर राशीच्या लोकांना सती सतीपासून मुक्ती मिळू शकणार आहे. 14 मार्च रोजी सूर्य देव कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहे. म्हणजेच 29 मार्च रोजी मीन राशीत शनि आणि सूर्याची युती होणार आहे.

ज्योतिष्य तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, २०२५ मध्ये शनि आणि सूर्याच्या संयोगामुळे 3 राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. ज्यामध्ये मेष, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांचा समावेश आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य हा ऊर्जा, आत्मा, पिता आणि आदराचा कारक मानला जातो, तर शनिदेव न्याय आणि कृतीचा कारक मानला जातो.

धार्मिक मान्यतेनुसार सूर्य आणि शनि यांचे नाते पिता-पुत्राचे असतं. पण वडील आणि मुलाचे नाते चांगले मानले जात नाही. वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि शनि हे दोघेही एकमेकांचे शत्रू मानले जातात. त्यामुळे या काळात काही राशींच्या व्यक्तींना नकारात्मक परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मेष रास

मेष राशीच्या लोकांना पैशाचे व्यवहार आणि व्यवसायात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी नोकरदार लोकांना आर्थिक नुकसान होऊ शकतं. दुकानदारांना जुन्या गुंतवणुकीतून अपेक्षित नफा मिळणार नाही. कामाच्या ठिकाणी मोठे वाद होऊ शकतात.

तूळ रास

सूर्य आणि शनीच्या युतीचा तूळ राशीच्या लोकांवर अशुभ प्रभाव पडू शकणार आहे. विवाहित लोकांच्या आयुष्यात एकामागून एक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे कुटुंबातील वातावरण तणावपूर्ण राहण्याची शक्यता आहे.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांचं वडिलोपार्जित संपत्तीमुळे कुटुंबातील सदस्यांशी भांडण होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात अडचणी येऊ शकतात. नवीन जमीन आणि वाहन खरेदीसाठी हा काळ शुभ नाही. आरोग्याशी संबंधीत तुम्हाला त्रास होऊ शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT