Shash Mahapurush Rajyog saam tv
राशिभविष्य

Shash Mahapurush Rajyog: आज होळीच्या दिवशी शनीने बनवला शश राजयोग; 'या' 3 राशींना गोल्डन टाईम होणार सुरु

Saturn Shasha Raja Yoga : शनि ग्रहाच्या सध्याच्या स्थितीमुळे होळीच्या दिवशी शुभ शश राजयोगाची निर्मिती होणार आहे. पंच महापुरुष राजयोगाच्या प्रभावामुळे काही राशींच्या लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा मिळण्याची संधी आहे. काहींना त्यांच्या आयुष्यात नवीन संधी आणि महत्त्वपूर्ण धडे शिकायला मिळतील.

Surabhi Jayashree Jagdish

या वर्षीची होळी खूपच वेगळी मानली जातेय. या वर्षी होळीच्या दिवशी वर्षातील पहिलं चंद्रग्रहण होत आहे आणि ग्रहांच्या स्थितीत बदल झाल्यामुळे अनेक राजयोग तयार होतायत. त्याचा परिणाम देश आणि जगासह प्रत्येक हो असतो. कर्माचे फळ देणारा शनि सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभात स्थित आहे.

शनी ग्रहाच्या या स्थितीमुळे ज्यामुळे होळीला शश राजयोग तयार होणार आहे. यावेळी पंच महापुरुष राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतात. यामध्ये काही राशींना त्यांच्या आयुष्यात नव्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत. तर काहींना यावेळी प्रत्येक कामात लाभ मिळणार आहे. यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे ते पाहूयात.

वृषभ रास

शनी दहाव्या घरात शशराज योग निर्माण करणार आहे. अशा परिस्थितीत, या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळू शकणार आहे. आर्थिक लाभ देखील मिळू शकतो. तुमच्या आयुष्यात आनंद तुमच्या दारावर ठोठावू शकतो. करिअरच्या क्षेत्रातही तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता.

कुंभ रास

या राशीच्या चिन्हाखाली जन्मलेल्या लोकांच्या जीवनावर याचा सकारात्मक परिणाम होऊ शकणार आहे. शनिदेवाच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात अपार यश तसंच आर्थिक लाभ मिळू शकणार आहे. तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ जाणार आहे. तुमचा कल अध्यात्माकडे अधिक असणार आहे. शनिदेव तुमची कोणतीही जुनी इच्छा पूर्ण करू शकतात.

मिथुन रास

शनीचा शश राजयोग देखील या राशीच्या लोकांना आनंद देऊ शकणार आहे. व्यवसायाच्या क्षेत्राबद्दल बोलायचं झाले तर तुम्हाला जास्त नफा मिळू शकणार आहे. मित्र किंवा कुटुंबासह सहलीला जाऊ शकता. कामाच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

Somwar Upay: सोमवारच्या दिवशी करा 'या' सोप्या उपायांनी मिळवा सुख-शांती; भगवान शंकरही होतील प्रसन्न

Raw Banana Curry Recipe: फक्त काही मिनिटांत बनवा हिरव्या केळ्याची स्वादिष्ट करी, वाचा स्टेप-बाय-स्टेप रेसिपी

Accident: वारकऱ्यांना घेऊन जाणारी एसटी बस रस्त्यावर उलटली, ३० प्रवासी गंभीर जखमी

CA Topper 2025: छत्रपती संभाजीनगरच्या लेकाचा देशात डंका! राजन काबरा CA परीक्षेत पहिला

SCROLL FOR NEXT