Suday Special Nakshatra Update google
राशिभविष्य

Hasta Nakshatra : 'या' नक्षत्रात जन्मलेले लोक बनतात मोठे व्यावसायिक, मानसिक नैराश्याचाही सामना करावा लागतो, जाणून घ्या संपुर्ण माहिती

Suday Special Nakshatra Update : हस्त नक्षत्रातील व्यक्तींचे स्वभाव, करिअरच्या संधी आणि आरोग्यविषयक माहिती जाणून घ्या. हस्त नक्षत्राचे ज्योतिषशास्त्रातील विशेष गुणधर्म आणि यशस्वी मार्ग यांचा सखोल अभ्यास.

Sakshi Sunil Jadhav

हस्त नक्षत्र

हस्त नक्षत्र चंद्राच्या अमलाखाली येणारे नक्षत्र आहे. या नक्षत्राच्या व्यक्ती कर्मयोगी, धार्मिक कार्य तत्पर, अभिमानी, तसेच सिद्धांत व वेद यांची आवड आणि उत्तम जाण असणारे, उत्तम कार्यकर्ता, विद्वान, बुद्धिमान, व्यवहार कुशल, आनंदी, सदाचारी, ईश्वर भक्त, रसिक, हौशी, कलाप्रिय, विनायशील, निर्वसनी असतात.

पण काही कारणाने बिघडले तर मात्र निष्काळजी, निर्दयी, भांडणामध्ये हात घाई करण्यापर्यंत वेळ आणतात. कपट आणि लबाडपणामुळे दुःख होते. स्वतःच्या दोषामुळे साधारण जीवन आणि वृथा अभिमानामुळे दुःखास कारणीभूत होतात.यांची शरीर प्रकृती पाहिली असता बुद्धी आणि सौंदर्य हे चांगल्या प्रकारचे असते. बांधा उंच, प्रमाणशीर, रोगप्रतिकारशक्ती मध्यम, शौर्य, धैर्य, धाडस, पराक्रमशूरता अधिकार लालसा हे गुण मध्यम असतात. स्त्रियांच्या दृष्टीने सौंदर्य, बुद्धी, कला या दृष्टीने छान असते. प्रौढ वयातही या स्त्रिया तरुण दिसतात. या स्त्रिया सुंदर लाजतात. स्वच्छता टापटीतपणा कलासक्त प्रवृत्ती असते.

नोकरी व्यवसाय -

चंद्र आणि बुधाचा प्रभाव आहे त्यामुळे वाणिज्य विभाग, सेल्समन, प्रेस कारागीर, चित्रकार, राजदूत, संदेशवाहक, खेळसामग्री, विक्रेते, कंपोझिटर, बांधकाम संबंधी नोकरी किंवा व्यवसाय, शाई व्यवसाय, रंगव्यवसाय, जाहिराती प्रचारक, व्याख्याते, कलाकार, तलाव - नाले बांधकामाशी संबंध, पाईपलाईन टाकणे, स्वच्छतेचे काम करणारे, पोस्ट, एजन्सी, साहित्यकार इत्यादी.

रोग आजार -

या नक्षत्राची प्रतिकारशक्ती मध्यम असते. वात प्रकृती असल्यामुळे वायूविकार, पोटात गॅस धरणे, अंतरव्रण, बद्धकोष्ठता, श्वासात अडथळे, कातडी सैल पडणे, अमिबिक, जुलाब, फोबिया, हिस्टेरिया, टाइफाइड या रोगांचा सामना करावा लागतो. त्वचेचे काही विकार असू शकतात. तोंड येणे विटामिन बी ची कमतरता. या व्यक्ती उगाचच औषधे घेत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime News: फसवणूक प्रकरण: कल्याणमधील डॉक्टर बंटी बबलीला न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Manoj Jarange Patil: आखण्यात आला होता जिवे मारण्याचा कट, तरीही मनोज जरांगेंनी नाकारलं पोलीस संरक्षण; काय आहे कारण?

Aadhaar Card Update: आधार कार्डमध्ये येईल QR कोड; काही सेकंदात होतील बँकेची कामे

Sangli Accident : अपघाताचा थरार, भरधाव ऊसाच्या ट्रॅक्टरची धडक; ST बस ओढापत्रात कोसळली

निवडणूक आयुक्त अमित शाहांचे पाया पडले? नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT