मेष : नव्या प्रकल्पात काम करण्याची संधी मिळेल. दिवसभारत क्रिएटिव्ह काम करण्यावर भर द्याल. वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळाल्यानंतर आत्मविश्वास वाढेल.
वृषभ : आजचा दिवस भविष्यासाठी पुढील योजना आखण्यासाठी फायदेशीर ठरेल. प्रेमसंबंध सुधारतील. हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांचं सहकार्य मिळेल.
मिथुन : नव्या प्रकल्पाचं शांततेत नेतृत्व कराल. घर खरेदीचा मार्ग मोकळा होईल. कोर्टातील कायदेशीर प्रकरणे मिटतील.
कर्क : कार्यालयात सहकाऱ्यांना मदत करण्याची संधी मिळेल. आज दिवसभरात नवीन मित्र होतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
सिंह : पती-पत्नीच्या नात्यात गोडवा निर्माण होईल. संसारात रूची वाढेल. नव्या गोष्टी शिकण्यासाठी तयार राहा.
कन्या : तुमचे ध्येय पूर्ण होईल. कार्यालयात मॅनेजर कामाचं कौतुक करतील. जुन्या मित्रांची अचानक भेट होईल.
तुला : कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी मिळेल. तुमच्या कार्याने लोकांना आकर्षित कराल. दिवसभरात गुंतवणूक करण्याविषयक निर्णय घेणे टाळा.
वृश्चिक : तुमचं कुटुंब अडचणीत साथ देईल. तुमचं काम सहज होईल. दिवसभर मन प्रसन्न राहील.
धनु : जुन्या मित्रांबाबत झालेले गैरसमज दूर होतील. आजचा दिवस शांततेत जाईल. काम पूर्ण करण्यासाठी स्मार्ट फ्लान फॉलो करा.
मकर : सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणे महागात पडू शकते. कार्यक्रमानिमित्त नातेवाईकांची भेट होईल. कार्यालयात हळूहळू आत्मविश्वास वाढेल.
कुंभ : पार्टनरसोबत फिरायला जाण्यासाठी आजचा चांगला दिवस आहे. दिवसभरात घाईत कोणताही निर्णय घेणे टाळा. मित्र, कुटुंबातील सदस्यांना छोटीशी मदत कराल.
मीन : नव्या प्रकल्पाचं नेतृत्व करण्याची संधी मिळेल. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानून घ्याल. कुटुंबाला वेळ द्याल. मित्रांकडून पैसे उधार घेणे टाळा.
Disclaimer : लेखातील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून एखादा निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला जरून घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.