horoscope saam tv
राशिभविष्य

Shatank Yog: 3 दिवसांनी या राशींचे सुरु होणार अच्छे दिन; 'या' राशी खूप कमावू शकणार पैसा

Shatank Yog 2025: ज्योतिषांच्या मते, पुढील ३ दिवसांत काही राशींसाठी अत्यंत शुभ काळ सुरू होणार आहे. या काळात त्यांना अचानक धनलाभ, व्यवसायात प्रगती आणि आर्थिक स्थैर्य मिळण्याची शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषानुसार, शनी हा सर्वात गतीने चालणारा ग्रह मानला जातो. त्यामुळे त्यांचा प्रभाव कोणत्याही राशीवर दीर्घकाळ टिकतो. सध्या शनी मीन राशीत मार्गी झाले आहेत. त्यामुळे ते वेळोवेळी इतर ग्रहांसोबत युती करत राह. आता शनी आणि सूर्याच्या विशेष संयोगामुळे शतांक योग निर्माण होणार आहे.

7 डिसेंबर रोजी सूर्य आणि शनी एकमेकांपासून 100 अंश अंतरावर असणार आहे. ज्यामुळे Centile Combination किंवा 100° Combination तयार होणार आहे. या शुभ योगामुळे तीन राशींना प्रत्येक क्षेत्रात यश, मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा आणि प्रगती मिळण्याची शक्यता आहे. हा योग कोणत्या राशींसाठी लाभदायक आहे ते पाहूयात.

कुंभ रास (Aquarius Zodiac)

कुंभ राशीच्या लोकांसाठी सूर्य-शनीचा शतांक योग विशेष ठरू शकणार आहे. अचानक धनलाभ होणार आहे. नेतृत्व क्षमता वाढणार असून बँक-बॅलन्स मजबूत होईल. यावेळी भौतिक सुखांची वाढ होणार आहे. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी मान-सन्मान मिळणार आहे. मानसिक ताण कमी होणार आहे.

वृश्चिक रास (Scorpio Zodiac)

शतांक योगामुळे या राशींच्या व्यक्तींचे चांगले दिवस सुरु होणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुम्हाला कोणता ताण असेल तर तो कमी होणार आहे. आरोग्य सुधारणार असून येत्या काही दिवसांत तुम्हाला चांगली बातमी मिळू शकणार आहे.

मीन रास (Pisces Zodiac)

मीन राशीच्या व्यक्तींसाठी शतांक योग अनुकूल ठरणार आहे. यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. अध्यात्माकडे तुमचं मन जास्त लागेल. धार्मिक कार्यांमध्ये सहभाग वाढेल. वडिलांचं आरोग्यही चांगलं राहणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

What is CKYC: आता सारखं सारखं KYC ची गरज नाही, फक्त एकदाच करा CKYC; वाचा संपूर्ण प्रोसेस

Terrorist Arrested: दिल्ली पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला, लष्कर-ए-तोएबाच्या दहशतवाद्याला अटक

Maharashtra Live News Update: धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी

Gold Rate : ऐन लग्नसराईत चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किमतीतही मोठा बदल; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

Matka Water: माठात ही १ सिक्रेट गोष्ट ठेवा, पाणी फ्रिजपेक्षा होईल थंडगार

SCROLL FOR NEXT