Ganesh Chaturthi saam tv
राशिभविष्य

Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थीला बनणार ४ शुभ योग; बाप्पाच्या स्थापनेची 'ही' आहे योग्य वेळ

Ganesh Chaturthi 2024: यंदाच्या वर्षी ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. उदय तिथीनुसार 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थीचा सण साजरा करायचा आहे. या काळात आपल्या घरी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करायची आहे.

Surabhi Jayashree Jagdish

यंदाच्या वर्षी ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. या दिवशी आपल्या अनेकांच्या घरी बाप्पा विराजमान होणार आहेत. गणेश चतुर्थीचा हा सण गपणतीचा जम्नोत्सव म्हणून साजरा केला जातो. तब्बल १० दिवस हा सण अगदी उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते.

गणेश चतुर्थीची तिथी ही यंदाच्या वर्षी 6 सप्टेंबरला दुपारी 3.01 वाजेपासून 7 सप्टेंबरला संध्याकाळी 5.37 वाजेपर्यंत असणार आहे. या उदय तिथीनुसार 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थीचा सण साजरा करायचा आहे. या काळात आपल्या घरी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करायची आहे.

गणेश चतुर्थीच्या स्थापनेची वेळ

गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा आणि स्थापना करण्याची योग्य वेळ शनिवार, 7 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11.03 ते दुपारी 1.34 पर्यंत आहे. या काळात तुम्ही घरच्या घरी बाप्पाची स्थापना करू शकता. यानंतर बाप्पाची स्थापना झाल्यानंतर त्याची पूजा करायची आहे.

गणेश चतुर्थीला बनतायत खास शुभ योग

दरम्यान यंदाच्या वर्षी गणेश चतुर्थीला अनेक शुभ योगांची निर्मिती होणार आहे. हे योग या दिवसाला विशेष बनवणार आहेत. यावेळी ७ सप्टेंबर रोजी सर्वार्थ सिद्धी योगाची निर्मिती होणार आहे. हा योगाचा काळ दुपारी १२.३४ ते ८ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजून ३ मिनिटांपर्यंत असणार आहे.

याशिवाय गणेश चतुर्थीला सकाळी ब्रह्म योग असणार आहे. जो रात्री 11 वाजून 17 मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचप्रमाणे इंद्र योगही यादिवशी असणार आहे. या दोन योगांव्यतिरिक्त रवि योग सकाळी 06.02 मिनिटांपासून ते दुपारी 12.34 मिनिटांपर्यंत आहे.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toxic: यशच्या 'टॉक्सिक'ला बकवास म्हणणं प्रसिद्ध यूट्यूबरला पडलं महागात; थेट मिळाली कायदेशीर नोटीस

Fact Check : आधार कार्ड दाखवून ३ लाखांचे कर्ज, सरकारच्या अधिकृत स्पष्टीकरणाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: एमपीएससी पेपर फुटी प्रकरणात मुंबई पोलिसांकडनं तपासाला गती

Gold Rate Today: रक्षाबंधनाला सोनं खरेदीची सुवर्णसंधी, 10 तोळा सोनं 31600 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

EPFO Update : नोकरी करणाऱ्या पती-पत्नींसाठी महत्त्वाची बातमी! लग्नानंतर EPFO खात्या संबंधित 'हे' एक काम करायला विसरलात? नंतर होईल गोंधळ

SCROLL FOR NEXT