Gajkesari Rajyog 2024 saam tv
राशिभविष्य

Gajkesari Rajyog: 9 जानेवारीला बनणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु, पद-पैसा मिळणार

Gajkesari Rajyog 2025: 9 जानेवारी रोजी रात्री 8.46 वाजता चंद्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीमध्ये गुरु बृहस्पती आधीच उपस्थित आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होतात. चंद्र हा नवग्रहांमध्ये सर्वात वेगाने फिरणारा ग्रह आहे. चंद्र एका राशीत फक्त अडीच दिवस राहतो. यामुळे चंद्र कोणत्या ना कोणत्या ग्रहाच्या संयोग करतोच.

चंद्राचा काही ग्रहांशी संयोग अत्यंत शुभ मानण्यात येतो. 9 जानेवारी रोजी रात्री 8.46 वाजता चंद्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीमध्ये गुरु बृहस्पती आधीच उपस्थित आहे. त्यामुळे वृषभ राशीमध्ये गुरु आणि चंद्राची युती होणार आहे. परिणामी गजकेसरी राजयोग तयार होणार आहे.

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, या राजयोगाच्या निर्मितीचा 12 राशींच्या व्यक्तींवर काही ना काही परिणाम होणार आहे. या राजयोगामुळे काही राशींच्या व्यक्तींचं आयुष्य उजळू शकणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना या काळात लाभ होणार आहे.

वृषभ रास

या राशीच्या चढत्या घरात गजकेसरी राजयोग तयार होणार असून प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळवू शकणार आहे. तुम्ही प्रत्येक समस्या आणि आव्हानावर मात करू शकणार आहात. या काळात तुम्हाला भरपूर नफाही मिळू शकणार आहे. नोकरदार लोकांसाठी हा आठवडा चांगला जाणार आहे. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ देखील मिळू शकतो.

धनु रास

या राशीमध्ये सहाव्या घरात गजकेसरी योग तयार होणार आहे. या राशीच्या लोकांना वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभासोबत अचानक आर्थिक लाभ होऊ शकणार आहे. तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या नोकरीवर असणार आहे. ज्यामुळे तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात तुमची योजना फायदेशीर ठरू शकणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे.

कुंभ रास

या राशीच्या लोकांसाठीही गजकेसरी योग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित काम पुन्हा पूर्ण होऊ शकतात. यामुळे तुम्हाला फायद्यांसोबतच खूप आनंद मिळू शकतो. नोकरदार लोकांनाही लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. मेहनतीला चांगला प्रतिसाद मिळू शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! खणखणीत भाषनानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी, दोघेही खळखळून हसले, पाहा video

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

SCROLL FOR NEXT