rajyog saam tv
राशिभविष्य

Samsaptak Rajyog: १३ ऑक्टोबरपासून 'या' राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ; व्यवसायात नफा आणि नवीन नोकरीची संधी!

Surabhi Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा खास राजयोग तयार होऊन सर्व राशींच्या व्यक्तींवर याचा परिणाम होताना दिसतो. दरम्यान दिवाळीपूर्वी गुरु, गुरू आणि शुक्र एकत्र येऊन समसप्तक राजयोग तयार होणार आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार, सध्या गुरू वृषभ राशीमध्ये स्थित असून शुक्र 13 ऑक्टोबर रोजी तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. जेव्हा गुरू आणि शुक्र एकमेकांपासून एका घराच्या अंतरावर असतील तेव्हा समसप्तक राजयोग तयार होतो. येत्या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचा लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

वृषभ रास

गुरू आणि शुक्राच्या या गोचरमुळे समसप्तक राजयोग तयार होणार असून या राशीच्या लोकांसाठी तो लकी ठरणार आहे. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. नोकरदार लोकांना नव्या नोकरीची संधी मिळू शकते. परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे.

सिंह रास

शुक्र गुरू समसप्तक योग लाभदायक ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला भौतिक सुख मिळू शकणार आहे. करिअरमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकणार आहे. या काळात व्यवसायातही भरपूर नफा होणार आहे. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळू शकणार आहे.

धनु रास

गुरू-शुक्र यांनी तयार केलेला समसप्तक राजयोग लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकणार आहे. व्यावसायिकांना नोकरीच्या संधी वाढणार आहे. करिअरच्या संदर्भात काही नवीन कल्पनांचा विचार करू शकता. घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकतं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : 'देवा भाऊ जो बोलता है वो करता है..'; फडणवीसांची रावडी डायलॉगबाजी

Marathi News Live Updates : नगरमध्ये भाजपला पुन्हा एक धक्का बसण्याची शक्यता

Dipa Karmakar Retirement: दीपा कर्माकरचा जिम्नॅस्टीक्स रामराम! अवघ्या ०.१५ गुणांनी हुकलं होतं ऑलिम्पिक मेडल

Nagpur Picnic Spot : नागपूरच्या 'या' तलावात घेता येणार म्युझिकल फाऊंटेनचा आनंद

VIDEO : उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत शिरसाट यांचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT