Dipa Karmakar Retirement: दीपा कर्माकरचा जिम्नॅस्टीक्स रामराम! अवघ्या ०.१५ गुणांनी हुकलं होतं ऑलिम्पिक मेडल

Dipa Karmakar Retirement News In Marathi: भारताची स्टार जिम्नॅस्टपटू दीपा कर्माकरने जिम्नॅस्टीक्समधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
Dipa Karmakar Retirement: दीपा कर्माकरचा जिम्नॅस्टीक्स रामराम! अवघ्या ०.१५ गुणांनी हुकलं होतं ऑलिम्पिक मेडल
dipa karmakaryandex
Published on

ऑलिम्पिक स्पर्धेत अवघ्या ०.१५ अंकाने पदक हुकणारी जिम्नॅस्टपटू दीपा कर्माकरने सर्वांना आश्चर्यचकीत करणारा निर्णय घेतला आहे. सोमवारी पोस्ट शेअर करत तिने जिम्नॅस्टीक्समधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. जिम्नॅस्टीक्स क्रीडा प्रकारात ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पहिल्या महिला खेळाडूचा मान मिळवणाऱ्या दीपाला वॉल्ट स्पर्धेत चौथ्या स्थानी समाधान मानावं लागलं होतं.

dipa karmakar
dipa karmakaryandex

काय म्हणाली दीपा कर्माकर?

दीपाने आपल्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने लिहिले की, 'खूप विचार केल्यानंतर मी प्रोफेशनल जिम्नॅस्टीक्सला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मुळीच सोपा नव्हता.

dipa karmakar
dipa karmakaryandex

मात्र मला असं वाटतंय की, हा निर्णय घेण्याची ही योग्य वेळ आहे. जिम्नॅस्टीक्स माझ्या आयुष्यातील महत्वाचा भाग राहिला आहे. मी प्रत्येक क्षण जगले आहे. प्रत्येक क्षणासाठी मी आभारी आहे. '

dipa karmakar
dipa karmakaryandex

तसेच तिने पुढे लिहिले की, 'मला ५ वर्षांची दीपा आठवते. तिला असं सांगितलं गेलं होतं की, फ्लॅट फीट असल्यामुळे ती कधीच जिम्नॅस्टपटू होऊ शकणार नाही. मात्र आज मी मिळवलेलं यश पाहून मला खूप अभिमान वाटतो.

dipa karmakar
dipa karmakaryandex

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधीत्व करणं आणि देशासाठी पदक जिंकणं, रियो ओलम्पिक स्पर्धेत प्रोडूनावा वॉल्ट प्रदर्शन करणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मणीय क्षण आहे. आज मला दीपाला पाहून खूप आनंद होतो की, तिने स्वप्न पाहण्याची हिम्मत दाखवली.'

dipa karmakar
dipa karmakaryandex

'मी जरी निवृत्त झाले असले, तरीदेखील माझं आणि जिम्नॅस्टीक्सचं नातं कधीच तुटणार नाही. मला या खेळात खूप काही परत करायचं आहे. मी मेंटॉर, कोच बनून माझ्यासारख्या आणि इतर मुलींना मदत करु शकते. मी तुम्हा सर्वांचे आभार मानते.' असं दीपा कर्माकर म्हणाली.

dipa karmakar
dipa karmakaryandex

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com