Venus Transit saam tv
राशिभविष्य

Shukra Gochar: 28 डिसेंबरपासून'या' राशींच्या मागे लागणार केवळ अडचणी; आयुष्यात होणार मोठी उलथा-पालथ

Shukra Gochar 2024: काही राशीच्या लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शुक्र कुंभ राशीत गेल्याने कोणत्या राशींना अडचणी येऊ शकतात ते जाणून घेऊया.

Surabhi Jayashree Jagdish

एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होतो. येत्या काळात दैत्य गुरु शुक्र ग्रह त्याच्या राशीत बदल करणार आहे. शुक्र हा धन, समृद्धी, आनंद, आकर्षण यांचा कारक मानला जातो. शुक्र ग्रह 26 दिवसांनी त्याच्या राशीत बदल करतो.

सध्या शुक्र शनीच्या राशीत मकर राशीत आहे. वर्षाच्या शेवटी शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र 28 डिसेंबर रोजी रात्री 11:48 वाजता कुंभ राशीत प्रवेश करणार असून 28 जानेवारी 2025 पर्यंत तो या राशीत राहणार आहे. शुक्राचं शनीच्या राशीत प्रवेश झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो, तर काही राशीच्या लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शुक्र कुंभ राशीत गेल्याने कोणत्या राशींना अडचणी येऊ शकतात ते जाणून घेऊया.

कन्या रास

या राशीच्या लोकांनी या काळात काहीसं सावध राहणं गरजेचं आहे. या राशीच्या लोकांचे शिक्षक किंवा वडिलांशी एखाद्या विषयावर वाद होऊ शकतात. तुमच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या काळात कर्ज घेण्याची गरज भासू शकते. कुटुंबासोबत काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो.

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी शुक्राचं कुंभ राशीत प्रवेश करणं देखील कठीण होणार आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. शुक्राच्या गोचरमुळे या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. आरोग्याबाबत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. कायदेशीर बाबींमध्ये अडकण्याची शक्यता आहे.

कर्क रास

शुक्र कुंभ राशीत प्रवेश करत असल्यामुळे या राशीच्या लोकांच्या जीवनात संमिश्र परिणाम मिळणार आहेत. या काळात अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. पैशाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. तुमच्याकडून धनहानी होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dog Attack : पाळीव जर्मन शेफर्ड श्वानाचा मुलावर हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Abhyang Snan Time: दिवाळी पहाटच्या दिवशी 'अभ्यंगस्नान' कधी करावे? वाचा शुभ मूहूर्त

Maharashtra Live News Update : पाळीव जर्मन शेफर्ड श्वानाने केलेल्या हल्ल्यात चिमुकला मुलगा गंभीर जखमी

Diwali 2025 : आली दिवाळी! फटाके फोडताना 'ही' घ्या काळजी, नाहीतर...

Priyadarshini Indalkar: चुनरी तेरी कमाल कर गई.... प्रियदर्शनी इंदुलकरचा हटके लूक

SCROLL FOR NEXT