Horoscope saam tv
राशिभविष्य

Friday Horoscope : मित्रांसोबत संबंध बिघडलेत? 'या' राशींच्या लोकांना मैत्रीत लाभ होणार, वाचा राशीभविष्य

Friday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांच्या मैत्रीत लाभ होणार आहे. तर काहींचे बिघडलेले मैत्रीचे संबंध सुधारतील. वाचा शुक्रवाराचं राशीभविष्य एका क्लिकवर

Anjali Potdar

आजचे पंचांग

शुक्रवार,२७ जून २०२५,आषाढ शुक्लपक्ष.

तिथी-द्वितीया ११|२०

रास- कर्क

नक्षत्र- पुनर्वसु

योग-व्याघात

करण-कौलव

दिनविशेष-शुभ दिवस

मेष - घराची निगडित व्यवहार काही असतील तर असते आज ते पूर्ण होतील. नवी काही खरेदी होईल. शेती बागायती मध्ये फायदा होईल. दिवस शुभ आहे.

वृषभ - जवळचे प्रवास होतील. प्रेमामध्ये लाभ होतील. शेजारी आणि भावंडांपासून विशेष सहकार्य लाभेल. बहिणीची माया लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार वेळेत पार पडतील.

मिथुन - सुख आले दारी असा दिवस आहे. धनाची आवक उत्तम राहील. कुटुंबीयांमध्ये खेळीमेळीचे वातावरणाने मन भरलेले राहील. खाण्यापिण्याची मांदियाळी राहील.

कर्क - सहज, सोप्या गोष्टी आज दिवस भरात घडतील. सकारात्मकता राहील. आपला प्रभाव इतरांवर राहील. आपल्या राशीच्या स्वभावामुळे पाहुणा आनंदात न्हातो .आज आगत्य विशेषत्वाने कराल. दिवस आनंदी आहे.

सिंह - विनाकरण वाद, कटकटी आपल्या बाबतीत होतील. अफवा सुद्धा उठतील. राशीला आपल्या साहस आणि धाडस भरपूर आहे. आलेल्या गोष्टींची सामना करताना दोन हात सहज करू शकाल.

कन्या - मैत्रीमध्ये समझोता होईल. नव्याने परिचय होतील. परदेशी भाषा आणि परदेशी मित्रांमुळे विशेष फायदा संभवतो आहे. प्रदर्शन, व्यवसायांमध्ये नवीन गोष्टी करून त्यातून आज लाभ संभवत आहे.

तूळ - कामासाठी प्रवासाचे योग आहेत. यशस्वीपण आहे. कामाचे नव्याने दालने निर्माण होतील. वरिष्ठ व्यक्तीकडून कौतुक होईल. सहकाऱ्यांचे सहकार्य उत्तम लाभल्यामुळे एक वेगळा हुरूप आज असेल.

वृश्चिक - कुलस्वामिनी ची उपासना आज फलदायी ठरेल. मोठे प्रवास होतील. प्रवासामधून सुवार्ता समजतील. प्रेमामध्ये यश मिळेल. दिवस आनंदी आहे.

धनु - अचानक धनलाभची शक्यता आहे. कदाचित हा पैसा वाम मार्गातून मिळेल. मात्र काळा पैसा अधिक घेताना सरकारी गोष्टीत अडकू नये याची काळजी घ्या.

मकर - जोडीदाराबरोबर तडजोड करून पुढे जावं लागेल. व्यावसायिक क्षेत्रामध्ये प्रगती आहे. भागीदाराबरोबर नवीन नवीन संकल्प अमलात आणाल .कष्टाला आज पर्याय नाही हे लक्षात ठेवा.

कुंभ - गुप्त शत्रू वाढतील. नोकरीमध्ये मात्र नेटाने कामाला लागाल. प्रगतीचे योग आहेत. संधिवाताचा त्रास असणाऱ्यांनी आज विशेष तब्येत जपावी. हाडाची दुखणे डोके वर काढतील.

मीन -दत्तगुरूंची उपासना आज फलदायी ठरेल. सृजनशीलता वाढेल. नव्या नव्या गोष्टी करण्यामध्ये दिवस व्यस्त राहील. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. अभ्यासात गती आणि प्रगती दिसते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political Clash: छावा विरुद्ध राष्ट्रवादी, महाराष्ट्रात वाद पेटला

Pune Crime : मुलाने प्रॉपर्टीसाठी छळ करायची सीमा गाठली; आईला वृद्धाश्रमात धाडलं, बहिणीला मनोरुग्णालयात, पुण्यातील प्रकार

Manikrao Kokate: रमी खेळणं कृषीमंत्र्यांना भोवणार? वाचाळवीर कोकाटेंचं मंत्रिपद जाणार?

Jagdeep Dhankhar Resign : मोठी बातमी! जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा, कारणही समोर

Ind vs Eng Test : इंग्लंडचा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का; मँचेस्टर कसोटीच्या २ दिवस आधीच प्लेइंग इलेव्हनची घोषणा, जादुई खेळाडूची ८ वर्षांनी एन्ट्री

SCROLL FOR NEXT