January Grah Gochar 2025 saam tv
राशिभविष्य

January Grah Gochar: जानेवारीत सूर्य-मंगळासोबत ४ मोठे ग्रह करणार गोचर; 'या' राशींवर होणार धनाची बरसात

January Grah Gochar 2025: पुढील वर्षाचा पहिला महिना म्हणजेच जानेवारी २०२५ खूप खास असणार आहे. या महिन्यात 4 शक्तिशाली ग्रहांचं गोचर होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व 12 राशीच्या लोकांवर होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह त्यांच्या ठरलेल्या वेळी राशीमध्ये बदल करतात. यामुळे प्रत्येक महिन्याला काही ग्रहांचं गोचर होतं. उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार असून आपण सर्वजण 2025 मध्ये प्रवेश करेल. याबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. पुढील वर्षाचा पहिला महिना म्हणजेच जानेवारी २०२५ खूप खास असणार आहे. या महिन्यात 4 शक्तिशाली ग्रहांचं गोचर होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व 12 राशीच्या लोकांवर होणार आहे.

जानेवारी महिन्यात ग्रहांचं गोचर 4 जानेवारीपासून सुरू होणार आहे. बुध ग्रहापासून ही सुरुवात होणार असून ग्रहांचा राजकुमार बुध धनु राशीत प्रवेश करेल. यावेळी बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. यानंतर ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य देव 14 जानेवारीला मकर राशीत प्रवेश करणार आहे.

एका आठवड्यानंतर 21 जानेवारील, ग्रहांचा सेनापती म्हणजेच मंगळ मिथुन राशीत प्रवेश करेल. 24 जानेवारीला बुध जानेवारी महिन्यात दुसऱ्यांदा राशी बदल करणार आहे. सूर्य देवासोबत मकर राशीत बुधाचं गोचर होणार आहे. याने बुधादित्य राजयोग पुन्हा निर्माण होणार आहे. जानेवारी 2025 चा शेवटचा राशी बदल 28 जानेवारी रोजी होणार आहे. यावेळी शुक्र मीन राशीत जाणार आहे.

एकंदरीत जानेवारीत बुध, सूर्य, मंगळ आणि शुक्र या ग्रहांचं गोचर होणार आहे. जानेवारीतील त्यांचं गोचर काही लोकांच्या जीवनात आनंद आणणार आहे. जानेवारीपासूनच त्यांचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. नोकरी आणि व्यवसायात त्यांना प्रचंड प्रगती साधण्याची संधी मिळणार आहे. या काळात कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

तूळ रास

जानेवारीमध्ये या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. दीर्घकाळचे प्रलंबित असलेले प्रश्न सुटू शकणार आहेत. तुमच्या आर्थिक समस्या कमी होऊ लागतील. तुमच्या घरी लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो.

मकर रास

नववर्षात जानेवारी 2025 मध्ये 4 ग्रहांचं गोचर तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. विवाहित लोकांच्या जीवनात आनंद येणार आहे. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. कोर्टात तुमच्याविरूद्ध कोणती केस सुरु असेल तर त्यामध्ये तुम्हाला विजय मिळेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ऊसदर आंदोलनाचा ट्रक चालकांना मोठा फटका, २० रुपयांची पाण्याची बाटली ५० रुपयांना

SDRF boats capsize: मोठी दुर्घटना! मच्छीमारांना वाचवण्यासाठी गेलेल्या SDRF च्या दोन बोटी उलटल्या; १० जवान बेपत्ता

Ramayana Movie Review : रामाची मर्यादा, रावणाचा अहंकार अन् सीतेची शक्ती; रणबीर कपूरचा 'रामायण' चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला?

PWD Scam: कार्यकारी अभियंत्यासह ३ जणांना अटक, सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ

Silent Health Warning: सकाळी उठताच थकवा आणि पोट फुगल्यासारखे वाटतेय? दुर्लक्ष करू नका, असू शकतो 'हा' आजार

SCROLL FOR NEXT