Shash Rajyog saam tv
राशिभविष्य

Shash Rajyog: शनीदेवामुळे तयार झाला शश राजयोग; 'या' राशींच्या नशीबाची दारं उघडणार, मिळणार दुप्पट लाभ

Shash Rajyog 2025: शश राजयोग तयार केल्याने व्यक्तीच्या सुख-समृद्धीमध्ये वाढ होते. अशा परिस्थितीत, आपण जाणून घेऊया की कोणत्या राशीच्या व्यक्तींना या राजयोगाचे शुभ परिणाम मिळणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहांच्या प्रत्येक हालचालीचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर होत असतो. यामध्ये शनी देव नेहमी व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. अशुभ कृत्य करणाऱ्या व्यक्तीला शिक्षाही होते. या कारणास्तव, शनिदेवाला न्याय देवता आणि कर्मदाता देखील म्हटलं जातं.

या वेळी 18 जानेवारीला शश राजयोग तयार होतोय. अशा परिस्थितीत काही राशीच्या लोकांचं नशीब उजळू शकणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, शश राजयोग तयार केल्याने व्यक्तीच्या सुख-समृद्धीमध्ये वाढ होते. अशा परिस्थितीत, आपण जाणून घेऊया की कोणत्या राशीच्या व्यक्तींना या राजयोगाचे शुभ परिणाम मिळणार आहेत.

मिथुन रास

शश राजयोगाच्या निर्मितीमुळे या राशींच्या जीवनात आनंद येणार आहे. नोकरी क्षेत्रातील लोकांची मदत तुम्हाला मिळू शकते. तुम्ही कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जाण्याची योजना बनवू शकता. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आनंद मिळू शकणार आहे. व्यवसायात नफा मिळण्याचे संकेत आहेत.

तूळ रास

याशिवाय तूळ राशीच्या लोकांसाठी शश राजयोग शुभ राहणार आहे. या काळात रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला सन्मान मिळू शकणार आहे. तुम्हाला कर्ज म्हणून दिलेले पैसे मिळू शकतात. आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगले परिणाम मिळतील.

मकर रास

18 जानेवारी मकर राशीच्या लोकांसाठी अधिक महत्त्वाचा दिवस असणार आहे. विशेष व्यक्तीच्या मदतीने प्रलंबित कामं पूर्ण होणार आहेत. शनिदेवाची कृपा तुमच्यावर राहणार आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी योजना बनवता येऊ शकते. या काळात तुम्हाला चांगली बातमी मिळू शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gen-Z Podcast Bulletin : टीव्ही विश्वातील पहिलं Gen Z बुलेटिन फक्त साम टीव्हीवर; कधी आणि कुठे-कुठे बघायला मिळणार? वाचा

वनरक्षकालाच वाघानं उचलून नेलं? हल्ला करतानाचा वाघाचा व्हिडिओ?

Mumbai Voter List: मुंबईत मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ; ३५० हून अधिक मतदारांना पत्ताच नाही, मनसेकडून आंदोलनाचा इशारा

Accident : अपघाताचा थरार! भरधाव बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक; दोन्ही वाहनांचा चुराडा

Maharashtra Politics: राज ठाकरे मविआत सामिल होणार? मनसेसाठी शरद पवार आग्रही?

SCROLL FOR NEXT