Sarva Pitru Amavasya 2024 saam tv
राशिभविष्य

Sarva Pitru Amavasya 2024 : सर्व पितृ अमावास्येला करू नका 'या' चुका; वर्षभराच्या आत भोगावे लागतील गंभीर परिणाम

Surabhi Jagdish

पितृ पक्ष पंधरवड्याचा शेवटचा दिवस हा सर्वपित्री अमावस्या असतो. हिंदू धर्मात सर्वपित्री अमावस्येला अतिशय महत्त्व दिलं जातं. पितृ पक्षातील शेवटचं श्राद्ध-तर्पण सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करण्यात येतं. या दिवशी पूर्वजांना निरोप दिला जातो. १५ दिवसांच्या श्राद्ध पक्षामध्ये ज्या पितरांची मृत्यु तारीख माहित नाही आणि अज्ञात पितरांचं श्राद्ध सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करण्यात येतं. त्याचमुळे याला सर्वपित्री अमावस्या म्हटलं जातं.

हिंदू धर्मामध्ये या दिवसासाठी विशेष नियम देण्यात आले आहेत. पितृ अमावस्येच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये हे धार्मिक शास्त्रांमध्ये सांगण्यात आलंय.

सर्व पितृ अमावस्येला खास योग

पंचांगानुसार, सर्व पितृ अमावस्या तिथी 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9.39 वाजता सुरू झाली आहे. तर 2 आणि 3 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 12.18 वाजता समाप्त होणार आहे. तसंच 2 ऑक्टोबर रोजी म्हणजे आज सर्वार्थ सिद्धी योग तयार होतोय.

सर्व पितृ अमावस्येला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

  • 2 ऑक्टोबर म्हणजे आज सर्व पितृ अमावस्या आहे. या दिवशी पितरांचे श्राद्ध-तर्पण करावं लागतं. दरम्यान सर्व पितृ अमावस्येला काही गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. जाणून घेऊया या गोष्टी कोणत्या आहेत.

  • अमावस्येच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून पूजा, दान इत्यादी गोष्टी केल्या पाहिजेत.

  • सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी चुकूनही कांदा लसूण यांचा समावेश असलेले पदार्थ खाऊ नयेत.

  • त्याचप्रमाणे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी नखं, केस कापणं अशुभ मानलं जातं. यामुळे पितर नाराज होत असल्याचं मानलं जातं.

  • आजच्या दिवशी नव्या गोष्टींची किंवा कपड्यांची खरेदी करू नये. त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीशी भांडण किंवा रूसवा धरू नये.

  • आजच्या दिवशी कधीही वयस्कर व्यक्तींचा अपमान करू नये. किंवा कोणत्याही मुक्या जनावराला त्रास देणं तुम्हाला महागात पडब शकतं.

  • शक्य असेल तर आज गरिबांना दान करा

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur News : माळीण व इरसलवाडीच्या पुनरावृत्तीची शक्यता; कसारा येथे भूस्खलनाने घर कोसळले

Nagpur : तिघांचे हातपाय बांधले होते, मग स्वत: गळफास घेतला, सामूहिक आत्महत्या प्रकरणाचे गूढ वाढले

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरची चौकशी होणार; राज्य सरकारचा निर्णय

Ayushman Bharat: आयुष्मान भारत कार्ड हरवलंय? टेन्शन घेऊ नका, ही सोपी प्रोसेस करा मोफत उपचार होईल

Vastu Shastra For Dining Table: डायनिंग टेबलवर 'या' गोष्टी ठेवत असाल तर आजच काढून टाका; नात्यांमध्ये येईल दुरावा

SCROLL FOR NEXT