Ganesh Visarjan remedies by zodiac sign saam tv
राशिभविष्य

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

Ganesh Visarjan remedies by zodiac sign: ज्योतिषशास्त्रानुसार, आपल्या राशीनुसार गणपती विसर्जनाचा उपाय केल्यास त्याचे विशेष आणि शुभ परिणाम मिळतात. प्रत्येक राशीसाठी एक वेगळा उपाय सांगितला आहे, ज्यामुळे तुम्हाला बाप्पाची विशेष कृपा लाभेल आणि तुमच्या आयुष्यातील संकटे दूर होतील.

Surabhi Jayashree Jagdish

  • गणेश विसर्जन ६ सप्टेंबर २०२५ रोजी आहे.

  • प्रत्येक राशीसाठी विशेष विसर्जन उपाय सांगितले आहेत.

  • राशीनुसार फुले, अन्न आणि रंगाची निवड करावी.

यंदा गणेश विसर्जन ६ सप्टेंबर २०२५, शनिवार या दिवशी आहे. बाप्पांना निरोप देताना काही विशेष उपाय केल्यास त्यांचा आशीर्वाद मिळतो असं मानलं जातं. यासाठीच खाली प्रत्येक राशीसाठी खास उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय कोणते आहेत ते पाहूयात.

मेष

गणेश विसर्जनाच्या दिवशी लाल फुलं आणि लाडू लाल कपड्यात ठेवून गणपतीसमोर अर्पण करा आणि मग त्या पोटलीचे जलविसर्जन करा. यामुळे करिअर आणि व्यापारात प्रगती होण्यास मदत होते.

वृषभ

गणपतीसमोर दुर्वा आणि शुद्ध तूप अर्पण करा. यामुळे धनलाभ होतो आणि कुटुंबात सुख-शांती वाढते.

मिथुन

हिरव्या रंगाच्या कपड्यात मूग डाळ आणि हिरवी वेलची ठेवून गणपतीसमोर अर्पण करा व नंतर विसर्जित करा. यामुळे अभ्यासात आणि बुद्धीत वाढ होते.

कर्क

विसर्जनाच्या दिवशी गणेशजींना तांदूळ आणि दुधाची खीर अर्पण करा. या उपायाने घरात सुख-शांती नांदते.

सिंह

लाल फुले आणि गूळ गणपतीसमोर अर्पण करा. यामुळे पद-प्रतिष्ठा आणि मान-सन्मान वाढतो.

कन्या

विसर्जनावेळी भगवान गणेशांना दूर्वा आणि फळे अर्पण करा. यामुळे आरोग्य चांगलं राहतं आणि मानसिक ताण कमी होतो.

तूळ

गुलाबी फुले आणि मिश्री यांचा नैवेद्य गणपतींना द्या. यामुळे दांपत्य जीवनात मधुरता येते.

वृश्चिक

लाल चंदन आणि डाळिंब गणेशजींना अर्पण करा. यामुळे अडकलेली कामे पूर्ण होतात आणि पदोन्नतीची संधी निर्माण होते.

धनू

पिवळा कपडा आणि बेसनाचे लाडू गणपतींना अर्पण करा. यामुळे भाग्यात सकारात्मक बदल होतात आणि प्रवासात यश मिळते.

मकर

तीळ आणि गूळ यांचा नैवेद्य अर्पण करा. यामुळे धनसंचय वाढतो आणि संपत्तीचा लाभ होतो.

कुंभ

गणेश विसर्जनाच्या दिवशी निळी फुलं आणि मूग दान करा. यामुळे मानसिक शांती लाभते आणि आरोग्यात सुधारणा होते.

मीन

पांढरी फुलं आणि दुधापासून बनवलेल्या मिठाया गणेशजींना अर्पण करा. यामुळे जीवनात सुख-समृद्धी वाढते आणि वैवाहिक जीवनात आनंद येतो.

गणेश विसर्जन २०२५ मध्ये कोणत्या तारखेला आहे?

गणेश विसर्जन ६ सप्टेंबर २०२५ रोजी शनिवारी आहे.

मेष राशीसाठी विसर्जनाचा विशेष उपाय कोणता?

लाल फुले आणि लाडू लाल कपड्यात अर्पण करावे.

कन्या राशीच्या लोकांनी गणपतीला काय अर्पण करावे?

दूर्वा आणि फळे अर्पण करावीत.

धनू राशीसाठी कोणता नैवेद्य फायदेशीर आहे?

पिवळ्या कपड्यात बेसनाचे लाडू अर्पण करावेत.

वृश्चिक राशीसाठी विसर्जनाचा उपाय कोणता?

लाल चंदन आणि डाळिंब गणपतीला अर्पण करावे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT