Diwali Horoscope  saam tv
राशिभविष्य

Diwali Horoscope : शुक्र-बुधाच्या युतीने बनला लक्ष्मीनारायण राजयोग! दिवाळीपूर्वी ३ राशींचं नशीब चमकणार! ६ नोव्हेंबरपर्यंत पैशांचा पाऊस

Lakshmi Narayan Rajyog : ६ नोव्हेंबरपर्यंत लक्ष्मीनारायण राजयोगाचा प्रभाव राहणार आहे. तर तीन राशींच्या व्यक्तींची चांदी होणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

अखेर दिवाळीचा शुभ मूहूर्त जवळ आलाच. आता ३ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहेत. शुक्र आणि बुध या दोन ग्रहांच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण राजयोग निर्माण झाला आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत हा योग प्रभावी राहणार असल्याचं ज्योतिषीय गणित सांगतं. या योगामुळे काही राशींच्या आयुष्यात आर्थिक प्रगती, बिझनेसमध्ये फायदा आणि करिअरमध्ये चांगल्या संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. विशेष म्हणजे मेष, कन्या आणि मकर या तीन राशींसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. चला तर जाणून घेऊया, कोणत्या राशींना या योगाचा फायदा मिळू शकतो.

काय आहे लक्ष्मीनारायण राजयोग?

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा बुध आणि शुक्र एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा लक्ष्मीनारायण योग तयार होतो. शुक्र हा धन, वैभव, सुख आणि ऐश्वर्याचा कारक मानला जातो. तर बुध हा बुद्धिमत्ता, व्यापार, वाणी आणि विवेकाचा कारक आहे. या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे आर्थिक प्रगती आणि व्यवसायात लाभ मिळण्याचे संकेत मानले जातात.

६ नोव्हेंबरपर्यंत बुध आणि शुक्र कन्या राशीत असल्यामुळे हा योग तयार होत आहे. त्यानंतर शुक्राच्या राशीपरिवर्तनामुळे या योगात बदल होईल.

१. मेष राशी (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. सध्या या राशीवर शनीची साडेसाती सुरू असली, तरी लक्ष्मीनारायण योगामुळे काही सकारात्मक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. गुंतवणूक आणि व्यवसायाशी संबंधित कामांमध्ये फायदा होऊ शकतो. तसेच, आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे चांगले फळ मिळण्याचे संकेत आहेत.

२. कन्या राशी (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी दिवाळीचा काळ आनंददायी ठरू शकतो. आर्थिक बाबतीत लाभ मिळण्याची शक्यता आहे. बुध आणि शुक्राच्या युतीमुळे उत्पन्नाच्या नवीन संधी मिळू शकतात. तसेच बुधादित्य योगाचाही सकारात्मक प्रभाव मिळू शकतो. रखडलेली आर्थिक कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे.

३. मकर राशी (Capricorn)

मकर राशीच्या लोकांसाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने चांगला काळ असू शकतो. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते.

महत्त्वाची टीप: वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, राशीनुसार सांगितलेली फळे ही संभाव्य आहेत. याला निश्चित भविष्यवाणी समजू नये. कोणताही आर्थिक निर्णय केवळ ज्योतिषीय अंदाजावर घेऊ नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anarkali Dresses For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी खास अनारकली सूट, लेटेस्ट ट्रेडिंग 5 डिझाईन्स

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

Imran Khan: मुंबई उच्च न्यायालयात अभिनेता इम्रान खानची बिनशर्त माफी; भारत सोडावा लागणार? कोर्टात काय घडलं

ज्येष्ठ नेते शरद पवार रुग्णालयात दाखल; दुष्काळ दौरा रद्द

पॅनिक अटॅक म्हणजे नेमके काय? जाणून घ्या लक्षणे, कारणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT