Weekly Horoscope 19 To 25 October 2026: ऑक्टोबरचा तिससा आठवडा अनेक राशींच्या व्यक्तींसाठी नवीन आशा, संधी आणि आव्हानं घेऊन येणार आहे. १९ ते २५ ऑक्टोबर या काळात नोकरी व्यवसाय, आर्थिक नियोजन आणि कौटुंबिक जीवनात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. दसऱ्याच्या सणामुळे वातावरणात उत्साही असणार आहे. अशा परिस्थितीत तूळ, वृश्चिक, धनुस मकर, कुंभ आणि मीन या सहा राशींसाठी हा आठवडा कसा असेल? कोणत्या गोष्टींमध्ये यश मिळू शकतं आणि कुठे सावध राहण्याची गरज आहे? जाणून घ्या सविस्तर साप्ताहिक राशीभविष्य.
तूळ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल राखावा लागेल. नोकरीत सहकाऱ्यांची मदत मिळाल्याने रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. व्यावसायिकांनी भागीदारीतील अटी स्पष्ट ठेवणे योग्य राहील.
वृश्चिक राशीसाठी संयम आणि मेहनत महत्त्वाची ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांसमोर आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळू शकते. आर्थिक व्यवहार करताना घाई करू नका.
धनु राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी शोधण्याचा हा आठवडा ठरू शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्यांनी प्रयत्न सुरू ठेवावेत. बचतीला प्राधान्य दिल्यावर आर्थिक नियोजन जास्त मजबूत होईल. प्रेमजीवनात आनंदाचे क्षण मिळू शकतात. मित्रपरिवारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
मकर राशीच्या व्यक्तींवर कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. शिस्त, नियोजन आणि सातत्य यांच्या मदतीने कामे पूर्ण करता येतील. वरिष्ठांशी संवाद साधताना आत्मविश्वास ठेवा. आर्थिक बाबतीत मोठे निर्णय घेताना सर्व बाजू तपासा. कुटुंबासाठी वेळ काढणे महत्त्वाचे ठरेल. जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नात्यात विश्वास आणि स्थैर्य वाढेल.
कुंभ राशीसाठी नवीन कल्पना आणि कामाच्या वेगळ्या पद्धतींचा विचार करण्यासाठी हा आठवडा उपयुक्त ठरू शकतो. नोकरीत सहकाऱ्यांच्या मदतीने महत्त्वाची कामे मार्गी लागू शकतात. व्यवसायात तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचा विचार करता येईल.
मीन राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात भावनिक समतोल राखण्यावर भर द्यावा. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी परिस्थितीचा नीट अभ्यास करा. आर्थिक बाबतीत बचत आणि खर्चाचे नियोजन महत्त्वाचे राहील.
१९ ते २५ ऑक्टोबरदरम्यान कोणत्याही राशीच्या व्यक्तींनी आर्थिक निर्णय घाईत घेऊ नयेत. करिअरमध्ये सातत्य, नात्यांमध्ये संवाद आणि दैनंदिन आयुष्यात योग्य नियोजन यांना प्राधान्य द्या.
टीप: हे साप्ताहिक राशीभविष्य सामान्य ज्योतिषीय मार्गदर्शनासाठी आहे. महत्त्वाचे आर्थिक, व्यावसायिक किंवा वैयक्तिक निर्णय घेताना वस्तुस्थिती आणि तज्ज्ञांचा सल्ला विचारात घ्या. साम टिव्ही याचे समर्थन अथवा दावा करित नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.