Daily Horoscope Today 7th august 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya : या राशीचे व्यक्ती आज पडतील प्रेमात, विवाहाचे योग जुळून येतील; वाचा आजचं राशीभविष्य

Horoscope Today 7th August 2024 : दैनिक राशीभविष्य, आज बुधवार, मेष राशीचे लोक आज प्रेमात पडतील, तर कुंभ राशीच्या लग्नाचा योग जुळून येईल.

Anjali Potdar

आजचे पंचांग - दिनांक ७ ऑगस्ट २०२४

श्रावण शुक्लपक्ष. तिथी - तृतीया २२|०६. रास- सिंह २७|१५ नं. कन्या. नक्षत्र- पूर्वा. योग - परिघ. करण-तैतिल. दिनविशेष - उत्तम दिवस

मेष : प्रेमात पडण्याची शक्यता

नवीन परिचय होऊन आपण प्रेमात पडण्याची शक्यता आहे. सकारात्मक ऊर्जा घेऊन आलेला दिवस आहे. संतती सौख्य चांगले मिळेल.

वृषभ : जबाबदाऱ्या उचलाव्या लागतील

"क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे" असा आजचा दिवस आहे. स्वतः अनेक गोष्टी कराव्या लागतील आणि त्यातच आज रममाण व्हाल. घरच्या जबाबदाऱ्या उचलाव्या लागतील.

मिथुन : दिवस चांगला जाईल

ठरवलेल्या गोष्टी आज घडून येणार आहेत. काही धाडसाच्या गोष्टी आपल्याकडून घडतील छोटे प्रवास होतील. शेजाऱ्यांचे सहकार्य लाभेल. दिवस चांगला जाईल.

कर्क : संपत्ती प्राप्तीचे योग

लहानपणापासून उराशी बाळगत आलेली स्वप्न आता पूर्णत्वास जाणार आहेत. वारसा हक्क संपत्तीच्या बाबतीत दिवस काही नवीन बातमी घेऊन येणार आहे. संपत्ती प्राप्तीचे योग आहेत.

सिंह : आत्मविश्वासपूर्वक जगाल

आपल्याच डामडौल मध्ये राहाल. तुमच्यामुळे अनेकांचे कल्याण होण्याचे आज योग आहेत. आत्मविश्वासपूर्वक जगाल. महत्त्वाकांक्षा वाढीस लागतील.

कन्या : द्विधा मनस्थिती टाळा

मोठे बेत आखत असाल तर काळजीपूर्वक करा. पैशाचे व्यवहार जपून करावेत. मनस्ताप टाळण्यासाठी द्विधा मनस्थिती टाळा. निर्णय योग्य ते घ्या आणि योग्य मार्ग स्विकारा.

तूळ : लाभाचे योग आहेत

परदेशातील व्यवहार फायदेशीर ठरतील. नवीन व्यवसायाच्या बाबतीत दिवस चांगलं. खाद्यपदार्थांचे व्यवसाय असतील तर लाभाचे योग आहेत. जुने मित्र भेटतील.

वृश्चिक : मानसन्मान, प्रतिष्ठा वाढेल

मानसन्मान, प्रतिष्ठा वाढणार आहे. कामाबरोबर अडचणी पण उभ्या राहतील पण त्याला खड्यासारख्या बाजूला सारा. प्रवासाचे योग आहेत.

धनु : यश खेचून आणाल

धर्म, अध्यात्म यांत प्रगती होईल. यश खेचून आणाल. "केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे" असा आजचा दिवस आहे. तक्रार न करता नेटाने चला.

मकर : अडचणी वाढवू नका

उसनवारी किंवा इतर घेतलेल्या पैशातून त्रास होण्याची शक्यता आहे. खोट्या भुलथापांच्या मागे लागून स्वतः च्या अडचणी वाढवू नका. संमिश्र दिवस आहे.

कुंभ : बोलणे यशस्वी ठरतील

विवाह संदर्भातील बोलणे यशस्वी ठरतील. नव्याने नाती तयार होतील. "मोठ्यांविषयी आदर बाळगाल तर आपली कदर होईल". दिवस चांगला जाईल.

मीन : आपल्या वस्तू जपाव्यात

नोकरांकडून त्रास होण्याची शक्यता आहे. पैशाचे व्यवहार त्यांच्याशी नीट ठेवावेत. आपल्या वस्तू जपाव्यात. आरोग्याच्या तक्रारी वाढतील योग्य ते डॉक्टर निवडा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kopargaon Nagarparishad: भाजप आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले, मतदान प्रक्रियेदरम्यान राडा | Video Viral

Bread Pakoda: तेलाचा एकही थेंब न वापरता बनवा हॉटेलच्या चवीसारखे ब्रेड पकोडे, वाचा झटपट रेसिपी

Akshaye Khanna-Sunny Deol: अक्षय खन्ना आणि सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र; 'बोर्डर'नंतर 'या' चित्रपटात करणार काम

Bhendi Facepack : नैसर्गिक ग्लो मिळवण्यासाठी लावा भेंडीचा फेस पॅक

Relationship Tips: नवरा बायकोचं लग्नानंतर बोलणं कमी झालंय? 'या' टिप्स करा फॉलो, नातं होईल घट्ट

SCROLL FOR NEXT