Rashi Bhavishya 16 June 2024 Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today : मेषसह 12 राशींच्या लोकांसाठी कसा जाईल आजचा दिवस? वाचा तुमचे राशी भविष्य

Anjali Potdar

आजचे पंचांग १६ जून २०२४

वार - रविवार. तिथी -ज्येष्ठ शुक्ल दशमी. नक्षत्र - हस्त. योग - वरियान. करण - तैतील. रास - तूळ. दशहरा समाप्ती. गंगावतार - गंगापूजनाने दहा प्रकारची पापे नष्ट होतात. दिनविशेष - उत्तम दिवस.

मेष - आपली मते जोडीदाराबरोबर विचार विनिमय करून मार्ग काढण्यासाठी तयारीत रहाल. नवीन दिशा, नवीन मार्ग सापडणार आहे. एकूणच दिवस आजचा छान राहील.

वृषभ - नोकरीमध्ये त्रास असला तरी दिवस समाधानाचा राहील. कामे मार्गी लागतील. आज मात्र नको त्या लोकांवर वेळ आणि पैसा वाया गेला अशी भावना मनात येईल.

मिथुन - आर्थिक लाभ मिळतील. शेअर्समधील गुंतवणूक, लॉटरी मधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कलाक्षेत्रामध्ये सुसंधी मिळणार आहे. आज गंगा दशहरा समाप्ती. विशेष गंगा उपासना करा.

कर्क - शासकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना दिवस चांगला आहे. मानसिक स्वास्थ्य समाधान लाभणार आहे. घरामध्ये पाहुण्यांची ऊठबस सरबराई राहील.

सिंह - जिद्द चिकाटीने यश खेचून आणाल. काही वेळेला मनाची ताकद ही मनगटात उतरवूनच काम करावे लागते तसा आजचा दिवस आहे. भावंडांचे विशेष सहकार्य आपल्याला आज मिळणार आहे.

कन्या - आर्थिक देवाणघेवाण, आर्थिक लाभाचे प्रमाण छान राहणार आहे. वडिलोपार्जित प्रॉपर्टी, दाग दागिने याविषयी महत्त्वाच्या काही गोष्टी असतील तर त्याचे निर्णय आपल्या बाजूने लागण्याची शक्यता आहे.

तूळ - आजचा दिवस छान आणि आनंदाचा राहणार आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील सकारात्मकता राहील उत्साह आणि उमेद वाढेल.

वृश्चिक - दैनंदिन जीवनामध्ये व्यस्ताता राहील. उगाचच मनस्वास्थ्य खराब असल्याचे वाटेल. तराजूच्या पारड्यांसारखी आज दोलायमान स्थिती राहणार आहे.

धनु - आपले कार्यक्षेत्र रुंदावणार आहे. अनेक सुसंधी समोर येतील. प्रसिद्धी वाढेल. संतती बाबतचे प्रश्न मार्गी लागतील. वेगळं काही करण्याची उमेद जाणवेल.

मकर - कामाच्या ठिकाणी विशेष कौतुक राहील. त्यासाठी प्रवासाची शक्यता आहे. प्रॉपर्टीचे प्रश्न किंवा त्या संदर्भात सौख्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.

कुंभ - धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. सर्वांच्या सहकार्याने अध्यात्मात आनंद लुटाल.इतरांविषयी मनामध्ये चांगली भावना राहील.आज विशेष गंगा पूजन करा.

मीन - तब्येत जपा. वाहने जपून चालवा. येणाऱ्या पैशापेक्षा जाणारा पैसा आज त्रासदायक ठरेल. त्यामुळे हा खर्चाचे प्रमाण सांभाळा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitin Gadkari : नवीन तंत्रज्ञानाने १० वर्षांत रस्त्यांवर एकही खड्डा पडणार नाही...; गडकरींची भर कार्यक्रमात गॅरंटी

Uday Samant News: पायलटचा टेक ऑफला नकार, उदय सामंतांना करावा लागला कारने प्रवास, नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics : वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, विधानसभेसाठी महायुतीचा गेम प्लॅन ठरला; मुंबईत काय घडलं?

Chandrapur News: चंद्रपुरमधील शाळा अदानींच्या ताब्यात! राज्य सरकारचा मोठा निर्णय; १५ दिवसात व्यवस्थापन बदलण्याचे निर्देश

Viral News: अबब...! तरुणीच्या डोक्यावर चक्क वेटोळे मारुन बसला साप; VIDEO व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले

SCROLL FOR NEXT