Rashi Bhavishya 27th July 2024  Saam Tv
राशिभविष्य

Horoscope Today : मेषसह ५ राशीच्या लोकांनी आज 'ही' चूक अजिबात करू नका; अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान

Rashi Bhavishya Today Marathi : आजचे राशीभविष्य, दैनिक पंचांग दिनांक - २७ जुलै २०२४ मेषसह ५ राशीच्या लोकांनी आज 'ही' चूक अजिबात करू नका

Anjali Potdar

आजचे पंचांग शनिवार दिनांक - २७ जुलै २०२४

आषाढ कृष्णपक्ष तिथी-सप्तमी. नक्षत्र-रेवती. योग - धृति. करण - विष्टी. रास - मीन. दिनविशेष - १० नंतर चांगला दिवस.

मेष : स्वभावावर नियंत्रण ठेवा

"कधी कधी आपण न केलेल्या गोष्टींचे खापर आपल्यावर येते". हा आपल्या स्वभावाचा दोष आहे. याच्यावर आज नियंत्रण ठेवल्यास दिवस बरा राहील. विनाकारण त्रागा आणि मानसिक ताण नकोत.

वृषभ : आनंदात सहभागी होण्याचे योग

चैनीसाठी पैसा खर्च करायला आपल्याला आवडते. इतरांनाही आज अनेक गोष्टी देऊन खुश कराल. नातेवाईक मित्रांबरोबर त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचे योग आहेत.

मिथुन : प्रगतीचे योग आहेत

बोलून व्यवसायाची वाढ होईल. कामाच्या ठिकाणी प्रगतीचे योग आहेत. प्रवास होतील आणि त्यातून फायदाही होईल. नवीन ओळखी होतील.

कर्क : राजकारणामध्ये प्रगतीचे योग

समाजकारण आणि राजकारणामध्ये प्रगतीचे योग आहेत. खूपदा इतरांना पुढे जाऊन देण्याचा आपला स्वभाव आज हानिकारक ठरू शकतो. आपल्याबरोबर इतरांचे कल्याण व्हावे अशी कामना करा.

सिंह : मोठी रिस्क घेऊ नका

सहज,साधे आणि सरळ व्यवहार ठेवल्यास आज दिवस चांगला राहील. पैशांशी निगडित असणाऱ्या कोणत्याही गोष्टींमध्ये खूप मोठी रिस्क घेऊ नका. शारीरिक श्रम वाढतील.

कन्या : कोर्टकचेरीच्या भानगडी नको

"तुझे माझे करण्यात उगाच वेळ घालवू नका". व्यवसायामध्ये भागीदाराबरोबर खांद्याला खांदा लावून काम करा. तर कामे वाढतील आणि मार्गी लागतील. कोर्टकचेरीच्या भानगडी नकोच.

तूळ : तब्येतीची काळजी घ्या

पोट व पोटाशी निगडित आजार आज डोके वर काढतील. बाहेरचे पाणी यांपासून स्वतःला जपा. जुने आजार त्रस्त करून सोडतील. सांधेदुखी वाढेल. तब्येतीची काळजी घ्या.

वृश्चिक : अनाठही खर्चावर आळा घाला

पैशाशी निगडित गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. त्यामध्ये योग्य ती वाढ होईल. "अनाठही खर्चावर आळा घाला". देवाची उपासना केल्यास योग्य ते फळ पदरात पडेल.

धनु : कामांचा गाडा उपसावा लागेल

"काय करू आणि काय नको" असा थोडा संभ्रमित दिवस असेल. कामांचा गाडा उपसावा लागेल. पण त्यामध्ये यशही मिळेल. वाहन सौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला.

मकर : एकट्यालाच श्रेय मिळेल

"न बोलता काम करणं हेच जास्त चांगलं" हे आज जाणवेल. एकट्याने काम केले की एकट्यालाच श्रेय मिळते हे सुध्दा लक्षात येईल. त्यामुळे पराक्रमाच्या दृष्टीने आजचा दिवस छान संधी घेऊन आलेला आहे.

कुंभ : आर्थिक पावले उचलू नका

जोडलेले संबंध आज कामे येतील ओळखीतून पैशाचे व्यवहार वाढतील. मात्र कोणाचेही बोलणे ऐकून सहज विश्वास ठेवून आर्थिक पावले उचलू नका.

मीन : आत्मिक समाधान लाभेल

"समाधान हे मागून घेता येत नाही" तर ते आपल्या आतच असावं लागतं. असाच आजचा दिवस आहे. केलेल्या गोष्टीची पूर्तता आणि होणाऱ्या गोष्टींची आखणी होणार आहे. आत्मिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Recipe : वाटीभर खोबऱ्यापासून बनवा 'हा' गोड पदार्थ, गावाकडे आहे खूपच प्रसिद्ध

Maharashtra Live News Update: बौद्धगया मुक्तीसाठी शिर्डीत आक्रोश आंदोलन

Mumbai Crime : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई; लोढा डेव्हलपर्सच्या माजी संचालकाला अटक

Post Office Schemes : बचत छोटी नफा मोठा ! महिलांसाठी पोस्ट ऑफिसच्या खास 4 योजना

India Semiconductor Mission : बेंगळुरूमध्ये डिझाइन होणार जगातील सर्वात प्रगत 2nm चिप्स; एआरएमच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT