Chaturgrahi Yog saam tv
राशिभविष्य

Chaturgrahi Yog: मीन राशीत बनणार चतुर्ग्रही योग; 14 एप्रिलपासून 'या' राशींचं नशीब चमकणार, नोकरीत होणार लाभ

Chaturgrahi Yog 2025: ग्रहांच्या विशेष संयोगामुळे तयार होणारा हा महाराजयोग काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. या कालावधीत काही लोकांचे नशीब चमकण्याची शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर त्याच्या राशीत बदल करतो.ज्याचा परिणाम १२ राशींच्या जीवनावर होतो. एप्रिल ते मे हा काळ ग्रहांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातोय. कारण या काळात मीन राशीत प्रमुख ग्रहांचा संयोग असणार आहे. या वेळी मीन राशीत सूर्य, बुध, राहू, शुक्र यांच्यासोबत शनी अस्ताच्या स्थितीत बसला आहे.

त्यामुळे या राशीत पंचग्रही योग तयार होत आहे. शनि आणि सूर्य हे शत्रू ग्रह असल्याने प्रत्येक राशीच्या लोकांना शुभ फळे मिळत नाही. १४ एप्रिल रोजी सूर्य मीन राशीतून निघून जाणार आहे. त्यामुळे चतुःग्रही योग तयार होणार आहे. ग्रहांच्या युतीमुळे निर्माण होणारा हा महाराजयोग अनेक राशीच्या लोकांचे भाग्य उजळवू शकणार आहे. यावेळी काही राशींसाठी हा योग लकी ठरणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मकर रास

या राशीच्या लोकांच्या कुंडलीच्या तिसऱ्या घरात चतुःग्रही योग तयार होणार आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे. रिअल इस्टेटमध्ये गुंतलेल्या लोकांना मोठे फायदे होऊ शकणार आहेत. उत्पन्नाचे अनेक मार्ग उघडणार आहेत. तुमची सर्व कामं उत्साहाने कराल. तुमच्या मनात नवीन नाविन्यपूर्ण कल्पना येणार आहे.

कुंभ रास

या राशीच्या दुसऱ्या घरात म्हणजेच धनाच्या घरात चतुःग्रही योग तयार होणार आहे. भाग्य घराचा स्वामी शुक्र, धन घरामध्ये भ्रमण करतोय. यावेळी तुम्ही कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला वेळ घालवू शकणार आहात. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळणार आहे. तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात.

मीन रास

या राशीमध्ये चौथ्या घरात हा राजयोग तयार होणार आहे. या काळात परदेशातून तुम्हाला चांगले परिणाम मिळणार आहेत. जर कोणत्या ठिकाणी तुमचे पैसे अडकले असतील तर ते तुम्हाला मिळू शकतात. तुमच्या कल अध्यात्माकडे अधिक असणार आहे. सरकारी कामात तुम्हाला चांगलं यश मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सुप्रिया सुळेंचा वंचितच्या शहर अध्यक्षांना फोन...

NPS Rule: कामाची बातमी! NPS च्या नियमात मोठा बदल; ₹५००० महिन्याला गुंतवा अन् ९२ लाख मिळवा

Christmas Celebration : भारतात ख्रिसमस कसा साजरा केला जातो? जाणून घ्या

Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्रीची हत्या, चाकूने सपासप वार करत संपवलं; बॉयफ्रेंडला अटक

Western Railway : पश्चिम रेल्वेवर 'या' दिवशी ३०० लोकल रद्द! नेमकं कारण काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT