Budh Gochar 2025 saamtv
राशिभविष्य

Budh Gochar 2025: सिंह राशीच्या घरात बुध ग्रहाच्या प्रवेशाने ८राशींचे वाढणार टेन्शन; नात्यात दुरावा अन् बसणार आर्थिक फटका

Budh Gochar 2025 : सिंह राशीत बुधाचे भ्रमण ८ राशींवर परिणाम करेल. या संक्रमणामुळे करिअर, आरोग्य आणि नातेसंबंधांमध्ये आव्हाने निर्माण होतील.

Bharat Jadhav

  • बुध गोचर २०२५ सिंह राशीत होणार आहे.

  • या गोचराचा परिणाम ८ राशींवर नकारात्मक होणार.

  • करिअर, आरोग्य आणि नात्यांवर ताण निर्माण होईल.

  • उपाययोजनांद्वारे बुध ग्रहाचा परिणाम कमी करता येऊ शकतो.

ग्रहांचा राजकुमार मानला जाणार बुध ग्रह राशीपरिवर्तन करणार आहे. बुध ग्रह सिंह राशीच्या घरात भ्रमण करणार आहे, याचा परिणाम ८ राशीच्या लोकांच्या जीवनावर होणार आहे. साधरण पंधरा दिवस या राशींसाठी आव्हानात्मक राहतील. या ८ राशींना अधिक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. या लोकांना त्यांच्या करिअर, आरोग्याच्या समस्या जाणवतील. त्यांच्या नातेसंबंधांवरही परिणाम होऊ शकतात. या ८ राशी कोणत्या आहेत, हे आपण जाणून घेऊ.

मेष

सिंह राशीतील बुध संक्रमणामुळे मेष राशीच्या लोकांच्या अडचणीत वाढ होईल. समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. सावधगिरीने आणि विवेकाने काम केले तर परिणाम वाईट होण्याची शक्यता कमी आहे. या काळात कोणत्याही मोठ्या कामाचं नियोजन करणं टाळावं.

वृषभ

वृषभ राशीसाठी सु्द्धा बुधाचे संक्रमण वाईट परिणाम दाखवणारे ठरणार आहे. व्यवसायात अडचणी येतील, नोकरीत काही काही त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरातही ताण-तणावाचे वातावरण असू शकते. आई-वडीलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

कर्क

सिंह राशीतील बुधाचे संक्रमण होण्यानं कर्क राशीसाठी कष्टाचे ठरणार आहे. परस्पर माहितीच्या अभावामुळे वैयक्तिक संबंधांमध्ये बदल करावे लागतील. सिंह राशीतील बुधाच्या वक्री स्थितीमुळे व्यावसायात आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

कन्या

बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे कन्या राशीच्या जातकांसाठी १५ दिवसाचा कालावधी आवाहनात्मक ठरेल. घरगुती वाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सुद्धा अस्थिर राहील. इतकेच नाही तर आरोग्याच्या समस्या सुद्धा उद्भवतील. नातेसंबंधांत दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक

या राशीतील जे लोक व्यवसाय करत आहेत, त्यांच्यासाठी हा संक्रमणाचा कालावधी संकटांचा ठरेल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तर काहींच्या नातेसंबंधात अहंकार अडवा येऊ शकतो.

मकर

बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे मकर राशीच्या जातकांना मोठा त्रास होणार आहे. अनेकांच्या नातेसंबंधात दुरावा निर्माण होईल. तर काहींच्या प्रेम जीवनात वाद होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या समस्या सुद्धा उद्धभवू शकतात.

कुंभ

बुध संक्रमणामुळे कुंभ राशीच्या लोकांचे मन विचलीत होण्याची शक्यता आहे. त्यांचे त्यांच्या कामावरून लक्ष विचलीत होईल. सिंह राशीतील बुध ग्रहाच्या प्रवेशानं वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अशांतता येईल.

मीन

सिंह राशीतील बुध संक्रमणामुळे मीन राशीच्या लोकांना त्यांच्या व्यावसायात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. घरगुती वाद वाढण्याची शक्यता आहे. क्षुल्लक कारणामुळे वाद घालणं टाळलं पाहिजे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही याला दुजोरा देत नाही.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Wednesday: कोणाच्या नशिबात धनलाभ, तर कोणाला आरोग्याची काळजी? वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra Rain Live News: बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे-मनसे पॅनलची आघाडी

मोनो रेलमध्ये २०० प्रवासी अडकले; प्रवाशांचा श्वास गुदमरला, भरपावसात रेस्क्यू ऑपरेशन, व्हिडिओ व्हायरल

ITR 2025 : आयटीआर परतावा कमी का मिळतोय? जाणून घ्या खरं कारण

Millet Nutrition : वजन कमी करण्यासाठी ज्वारी की नाचणी, कोणती भाकरी आहे जास्त फायदेशीर?

SCROLL FOR NEXT